Nagpur Car Accident Saam Tv
महाराष्ट्र

Nagpur Accident: नागपूरमध्ये पुन्हा एकदा भयंकर अपघात, भरधाव कारने 4 जणांना उडवलं; CCTV व्हिडिओ आला समोर

Nagpur News: नागपुरात अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. यातच नागपुरात हिट अँड रनची घटना ताजी असताना आता पुन्हा एकदा एक भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे.

साम टिव्ही ब्युरो

पराग ढोबळे, साम टीव्ही, नागपूर प्रतिनिधी

नागपुरात हिट अँड रनची घटना ताजी असताना आता पुन्हा एकदा एक भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. येथील केडीके कॉलेज चौकात भरधाव कारने चार लोकांना उडवल्याची घटना घडली आहे. भरधाव कार टर्निंग घेताना रस्त्याच्याकडेला असलेल्या भाजीपाल्याच्या दुकानात शिरली आहे. यामध्ये चार जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. या अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओही समोर आला आहे.

गेल्या तीन आठवड्यात अपघाताची ही तिसरी घटना येथे घडली आहे. या अपघातानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. तसेच अपघातात जखमी झालेल्यांना रुग्णायात दाखल करण्यात आलं आहे.

या सीसीटीव्ही व्हिडिओत दिसत आहे की, केडीके कॉलेज चौकात भाजीपाल्याच्या गादीवर काही लोक भाजी खरेदी करता दिसत आहे. तितक्यात एक भरधाव कार येते आणि भाजीपाल्याच्या गादीला जोरदार धडक देते. या अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडते. या अपघातात चार ते पाच जण जखमी झाले आहेत.

अपघातानंतर जवळच असलेले लोक हे अपघातात जखमी झालेल्या लोकांच्या मदतीला धावताना या व्हिडिओत दिसत आहेत. स्थानकांची या अपघाताची माहिती पोलिसांनी कळवली असता पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मिळालेल्या माहितीनुसार, अद्याप याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. पोलीस याचा अधिक तपास करत आहेत.

दरम्यान, याआधी नागपुरात मॉर्निंग वॉक करणाऱ्या २ महिलांना भरधाव कारने उडवल्याची घटना घडली होती. नागपूरच्या शारदा चौकात ३० मे रोजी ही घटना घडली होती. यामध्ये ममता अदमाने या गंभीर जखमी झाल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मध्य रेल्वे धावत्या लोकलमधून महिला पडली

अमृता फडणवीसांकडून जेवणासाठी निमंत्रण; मनोज जरांगेंनी काय उत्तर दिलं? पाहा VIDEO

मी आरक्षण सोडण्यास तयार; केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान, पण ठेवली ‘ही’ अट

Main Door Vastu Tips: घराच्या दरवाज्याविषयी 5 महत्वाच्या गोष्टी प्रत्येकाला माहित असायला हव्यात

Ganesh Chaturthi 2026: यंदा गणपती बाप्पांचं आगमन ठरणार विशेष; हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी, जाणून घ्या पुजेचा मुहूर्त

SCROLL FOR NEXT