nagar news saam tv
महाराष्ट्र

Nagar Crime News : गुजरातला निघालेल्या वाहनात गाेवा बनावटीची दारू, १५० बॉक्ससह दाेघांना अटक

खब-याने दिलेल्या माहितीनूसार वाहन नगर येथे येताच ते थांबवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला.

Siddharth Latkar

- सुशील थोरात

Nagar Crime News : नगर शहरातील कल्याण महामार्गावरून एका कंपनीच्या दारूचा साठा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकांनी जप्त केला आहे. यामध्ये पोलिसांनी तब्ब्ल १५० दारूचे बॉक्स जप्त केले आहेत. या प्रकरणी २ संशयितांना अटक करण्यात आली आहे. (Maharashtra News)

कल्याण महामार्गावरून दारूचा अवैध साठा एका वाहनांतून जाणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कल्याण महामार्गावरील नेप्तीनाका येथे सापळा लावला होता.

खब-याने दिलेल्या माहितीनूसार वाहन नगर येथे येताच ते थांबवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. परंतु चालकाने वाहन वेगात पुढे नेले. त्यानंतर पाेलिसांनी सिनेस्टाइलने पाठलाग करुन वाहनाला अडविले.

दरम्यान वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये अवैध रित्या गोवावरून गुजरातकडे तब्ब्ल १५० बॉक्सचा दारूचा साठा नेण्यात येत असल्याचं आढळून येताच पोलिसांनी वाहन ताब्यात घेतले.

या प्रकरणी २ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांची चोकशी करण्यात येत आहे अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मालवण बाजारपेठेत आग लावून सलूनचे दुकान जाळले.

ओव्हरटेकवरून वाद... नंतर रागाने पाहिलं, नागपूरात अभियांत्रिकी विद्यार्थ्याची भररस्त्यात चाकूने भोसकून हत्या

Albattya Galbattya Natak: कल्याणच्या नाट्यगृहाची अवस्था पाहून कलाकार संतापले; 'अलबत्या गलबत्या' कलाकारांचा व्हिडिओ व्हायरल

Thane Politics : ठाण्याच्या राजकारणात खळबळ! शिंदेसेनेच्या ९ नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार, कारण काय?

Kalyan Crime: पूजा पाठ करण्याच्या बहाण्याने भोंदू बाबाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग, कल्याणमधील संतापजनक घटना

SCROLL FOR NEXT