Nagar : अण्णा हजारे हे एक आदर्शवत महान व्यक्तिमत्व : राज्यपाल  सचिन आगरवाल
महाराष्ट्र

Nagar : अण्णा हजारे हे एक आदर्शवत महान व्यक्तिमत्व : राज्यपाल

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आदर्शगाव हिवरेबाजार नंतर राळेगणसिद्धी गावाला देखील भेट दिली. यावेळी त्यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी भेट घेतली.

सचिन आगरवाल

अहमदनगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे एक आदर्शवत महान व्यक्तित्व आहे. त्यांनी केवळ गावलाच नव्हे तर मला आणि अगदी पंतप्रधानांना सुद्धा वेगवेगळ्या ग्रामविकासाच्या प्रयोगाद्वारे मार्ग दाखवला आहे, असे गौरवोद्गार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राळेगणसिद्धी मध्ये अण्णांच्या भेटीनंतर ग्रामस्थांशी संवाद साधताना काढले.

हे देखील पहा

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आदर्शगाव हिवरेबाजार नंतर राळेगणसिद्धी गावाला देखील भेट दिली. त्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी भेट घेतली. अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धी गावात केलेले बंधारे आणि पाणलोट क्षेत्राची माहिती दिली. त्याचप्रमाणे गावातील सौरऊर्जा प्रकल्पाची देखील माहिती दिली.

यावेळी बोलताना, अण्णांनी आपल्याला रस्ता दाखवला तर आम्हाला आणि मोदींना देखील रास्ता दाखवत येईल असं मत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केली. त्याचप्रमाणे राळेगणसिद्धी मध्ये अण्णांनी केलेला सौरऊर्जा प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याही संकल्पनेत असल्याचे कोश्यारी यांनी म्हटलं आहे. राळेगणसिद्धी मध्ये ज्याप्रमाणे पाणलोट आणि बंधाऱ्यांचे काम झाले, तसेच इतर राज्यांमध्ये केले तर पाण्याचा प्रश्न सुटेल असा सल्ला अण्णांनी राज्यपालांना दिलाय.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

OBC/Maratha Reservation: हैदराबाद गॅझेट GR विरोधात ओबीसी कोर्टात; मराठा आरक्षणाला आव्हान

Bus Accident: भीषण अपघात! भरधाव बसची टँकरला धडक, ५० फूट खोल दरीत बस पलटली, अनेकजण वाहनाखाली दबले

Prime Minister Narendra Modi: पंतप्रधान मोदींकडून सरसंघचालकांचं कौतुक; ७५ व्या वाढदिवसामिनित्त दिल्या शुभेच्छा

Fact Check : महिलांसाठी स्वतंत्र दारू दुकान? सरकारकडून महिलांना पिण्याची स्पेशल सोय?

मराठा विद्यार्थ्यांना SEBC चा फटका? MPSC निकालात कट ऑफ वाढला

SCROLL FOR NEXT