Sale Newborn Baby : नागपूर येथून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्यात एकीकडे मुलींच्या शिक्षणासाठी आणि स्त्री सक्षमीकरणासाठी विविध यंत्रणा काम करत आहेत. अशात नागपूरच्या एका दाम्पत्याने काही पैशांसाठी आपल्या मुलीचा सौदा केलाय. मुलगी झाल्याने ती लहान असतानाच तिच्या आई वडीलांनी तिला विकलं आहे. (Nagapur Police)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2022 मधील बाळ विक्री प्रकरणात नागपूर पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला आहे. छत्तीसगडमधील धनाढ्य दाम्पत्याने ९ दिवसांच्या चिमुकलीचा अडीच लाखात सौदा केला आहे. यवतमाळमध्ये राहणाऱ्या या दाम्पत्याला तिसरी मुलगी झाली होती. तिचे पालनपोषण शक्य नसल्याने त्यांनी आपल्या पोटच्या मुलीला विकलं आहे.
ही चिमुकली आई बाबांच्या प्रेमासाठी तरसत होती. मात्र ती ९ दिवसांची असतानाच तिची विक्री करण्यात आली आहे. नागपूर (Nagpur) पोलीसांच्या गुन्हे शाखेनं ही घटना उघडकीस आणली आहे. बाळ विक्री करणाऱ्या श्वेता खान टोळीवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात तोतया डॅाक्टर पोलीसांच्या रडारवर आहे.
भाचीला ५५ हजाराला विकले; जबरस्तीने करून घेतला वेश्या व्यवसाय
पैशासाठी मावशीनेच भाचीला ५५ हजार रुपयांमध्ये विकल्याची धक्कादायक घटना दिल्लीमधील गोविंदपुरीमध्ये घडली आहे. माणूसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. पीडित तरुणी कशीबशी त्या व्यक्तीच्या तावडीतून सुटली आणि एका एनजीओच्या मदतीने पोलिसांपर्यंत पोहोचली. दिल्ली पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.