Sangli Saam
महाराष्ट्र

Sangli: शेतातील झाडावरच लिंबू, काळी बाहुली, दोरा अन् टाचण्या; सांगलीत नेमकं चाललंय तरी काय?

Ashta City in Sangli Gripped by Fear Due to Alleged Witchcraft: सांगली जिल्ह्यातील आष्टा शहरात जादूटोण्याचा प्रकार समोर आला आहे. आष्टीजवळील शेतातील झाडावर लिंबू, काळी बाहुली, दोरा आणि टाचण्या टोचल्या असल्याचं आढळून आलंय.

Bhagyashree Kamble

विजय पाटील, साम टीव्ही

सांगली जिल्ह्यातील आष्टा शहरात जादूटोण्याचा प्रकार समोर आला आहे. आष्टीजवळील शेतातील झाडावर लिंबू, काळी बाहुली, दोरा आणि टाचण्या टोचल्या असल्याचं आढळून आलंय. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची दखल घेऊन प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. हा प्रकार नक्की कुणी केला, याचाही शोध सुरू आहे.

आष्टा शहरात अलीकडच्या काळात जादूटोणा, बुवाबाजी आणि अंधश्रद्धेचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. रस्त्यांवर उतारे आढळणे आता नित्याचे झाले असून, यामुळे अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा प्रकार वाढत आहे. आज तर, एका शेतातील झाडावर जादूटोणा केल्याचा प्रकार दिसून आला आहे. सांगलीच्या आष्टा येथील शिंदे मळ्याजवळ सागर शिंदे यांचं शेत आहे. त्यांच्या शेतात एक मोठं झाड आहे.

शेतातील झाडाच्या बुंध्याला काळी बाहुली, लिंबू आणि टाचण्या टोचल्या असल्याचं आढळून आलं आहे. हा प्रकार पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले असून, हा प्रकार जादूटोण्याचा असावा, अशी शंका लोकांकडून व्यक्त केली जात आहे. विज्ञानाच्या युगात अशा प्रकारच्या अंधश्रद्धा सुरू असल्याने अनेकांनी डोक्यालाही हात लावला आहे.

शहरात अशी चर्चा सुरू आहे की, काही बुवा- बाबा, अंगारे-धुपारे करणाऱ्या महाराजांनी अनेक लोकांना वेड लावले आहे. इतकेच नव्हे तर, काही राजकीय नेतेही अशा प्रकारांमध्ये अडकले असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. या प्रकारानंतर शिंदे मळा परिसरात भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची दखल घेऊन प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नसरापूर अत्याचार आणि खून प्रकरण, ४ दिवसात दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले जाणार

महाराष्ट्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय! जुलैपासून लागू होणार 'लँड टायटलिंग ॲक्ट'; आता प्रत्येक फ्लॅटचे मिळणार 'मालमत्ता कार्ड'

Ladki Bahin Yojana: मे महिन्याची १० तारीख उजाडली! लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹३००० की ४५०० रुपये येणार? पाहा सविस्तर अपडेट

Pune Crime: पुणे हादरले! नवऱ्यासोबत कडाक्याचे भांडण, महिलेने ८ व्या मजल्यावरून मारली उडी

Maharashtra Farmer Loan : कर्जमाफीचा मोठा निर्णय! ३० जूनपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार; सहकार विभागाची सरकारला माहिती

SCROLL FOR NEXT