MVA Seat Allocation Saam Digital
महाराष्ट्र

MVA Seat Allocation : ठाकरे गट २० जागांवर ठाम, 'वंचित'चा तिढा न सुटलेल्या जागांवर दावा; मविआचं एकमत कसं होणार?

Maharashtra Politics News | MVA Seat Allocation: महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या प्रस्तावामुळे महाविकास आघाडी टिकणार की तुटणार ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. वंचित बहुजन आघाडीने एकूण 27 जागांची तयारी प्रस्तावामध्ये दर्शवली आहे.

Sandeep Gawade

Lok Sabha Election 2024

महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या प्रस्तावामुळे महाविकास आघाडी टिकणार की तुटणार ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. वंचित बहुजन आघाडीने एकूण 27 जागांची तयारी प्रस्तावामध्ये दर्शवली आहे. तर महाविकास आघाडीतील आतापर्यंत झालेल्या चर्चेत घटक पक्षाच्या वाट्याला आलेल्या संभाव्य जागांवर वंचितने दावा केला आहे. यामध्ये ठाकरे गटाच्या 7 जागा, काँग्रेसच्या 9 जागा तर राष्ट्रवादी पवार गटाच्या 5 जागांचा आणि तिढा असलेल्या 5 जागांवर वंचितने मागणी केली आहे. तर 48 पैकी शिवसेना ठाकरे गट एकूण वीस जागांवर निवडणूक लढवणार ठाम आहे.

लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपासंबंधी काल महाविकास आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्रातील ४८ जागांपैकी आघाडीतील सर्वच पक्षांच एकमत झालं आहे. कोण कुठे लढणार हे जवळपास निश्चित झालं आहे. त्यामुळे जागावाटपावर उद्याची शेवटची बैठक असून त्यानंतर बैठक होणार नाही, अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली होती. यावेळी पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले, जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधीही देखिल उपस्थित होते.

वंचितची सभा झाल्यावर त्यांच्या कार्यकारिणीची बैठक आहे. बैठकीत चर्चा करतील नंतर बैठकीला उपस्थित राहतील. जेव्हा प्रमुख नेते उद्धव ठाकरे आणि शरद पवार असतील तेव्हा जागा वाटपाचा मसुदा घोषित करतील. उद्या जागावाटप संदर्भात शेवटची बैठक असेल पण उद्या जागावाटपाचा मसुदा घोषित केला जाणार नसल्याचं राऊत यांनी स्पष्ट केलं होतं. मात्र वंचितने ठेवलेल्या प्रस्तावानंतर वाटाघाटी पुन्हा लांबण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nail Diseases : गरजेपेक्षा जास्त वाढतात नखे? 'या' ५ आजारांचा असू शकतो संकेत

Waffles Recipe: संध्याकाळी नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट वॉफल्स; वाचा रेसिपी

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Shiv Sena : राजकारणात खळबळ! शिंदे गटाच्या बड्या नेत्याला मध्यरात्री बेड्या; 'या' कारणामुळे झाली अटक

Yoga Benefits: रोज योगा केल्याने शरीरात कोणते बदल होतात?

SCROLL FOR NEXT