Raj Thackeray Saam TV
महाराष्ट्र

Jalna: राज ठाकरेंच्या पुतळ्याचे दहन; मनसे कार्यकर्त्यांची पाेलिस ठाण्यात धाव

महाराष्ट्रात जर त्यांच्या या वक्तव्यानंतर दंगली भडकल्या तर त्याला राज ठाकरे जबाबदार असतील असा इशारा यावेळी मुस्लिम कार्यकर्त्यांनी दिला.

लक्ष्मण सोळुंके

जालना : जालन्यात (jalna) मनसे (mns) कार्यकर्त्यांकडून सार्वजनिक ठिकाणी लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा लावल्याच्या निषेधार्थ मुस्लिम तरुणांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी तरुणांनी मनसे नेते राज ठाकरे (raj thackeray) आणि मनसे जिल्हाध्यक्ष रवी राऊत यांच्या पुतळ्याचे दहन केले. (raj thackeray latest marathi news)

पाडव्याच्या मेळाव्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील बेकायदेशीर भोंगे उतरवा नाहीतर आम्ही लाऊडस्पीकरवर 'हनुमान चालीसा' लावू असा इशारा दिला होता. राज ठाकरे यांच्या या इशाऱ्या नंतर जालन्यात महाराष्ट्र् नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत शहरातील बसस्थानक परिसरात असलेल्या रामभाऊ राऊत चौकात हनुमानाचे २५ फूट उंच फलक लावून जोरदार घोषणाबाजी करत सार्वजनिक ठिकाणी लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा लावली होती. याचाच निषेध म्हणून रात्री मुस्लिम कार्यकर्त्यांनी भोकरदन नाका परिसरात जोरदार घोषणाबाजी करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह मनसे जिल्हाध्यक्ष रवी राऊत यांच्या पुतळ्याचे दहन केले.

यावेळी युवकांनी मनसे कार्यकर्त्यांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली. महाराष्ट्रात जर त्यांच्या या वक्तव्यानंतर दंगली भडकल्या तर त्याला राज ठाकरे जबाबदार असतील असा इशारा यावेळी मुस्लिम कार्यकर्त्यांनी दिला.

मनसे कार्यकत्यांची पाेलिस ठाण्यात धाव

दरम्यान मुस्लिम कार्यकर्त्याच्या या आंदोलनानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्य कार्यकर्त्यांनी रात्री उशिरा सदर बाजार पोलिसात (police) धाव घेवून राज ठाकरे यांच्या पुतळ्याचे दहन केल्याने मनसे कार्यकर्त्याच्या भावना दुःखवल्या असल्याने आंदोलन करणाऱ्या मुस्लिम तरुणांना तात्काळ अटक करा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope: घरातले वातावरण आनंद राहील; 8 राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार, वाचा उद्याचे राशीभविष्य

Fatty Liver Disease: पायांमध्ये ही 3 महत्त्वाची लक्षणं दिसली तर समजा लिव्हरवर चरबी साचलीये!

VIDEO VIRAL : ईssssss....गच्चाळ जागेवरच चिवड्याचा ढिग, तो कामगार अन् पॅकिंग... व्हिडिओ बघून किळस येईल

बांगलादेश,नेपाळनंतर आणखी एका देशातील सरकार बदलणार? राजधानीची बॉर्डर कंटेनर्सनं सील

Maharashtra News Live Update: Dhule: पुण्यातील खडक पोलीस स्टेशनच तपास पथक पोलीस आयुक्तांनी केल्या बरखास्त

SCROLL FOR NEXT