Vishalgad News Today Saam tv
महाराष्ट्र

Vishalgad News Today : संभाजीराजे छत्रपती यांना अटक करा; 'विशाळगडा'वरून राजकारण तापलं, आंदोलकांची तीव्र निर्देशने

vishalgad news today marathi : 'विशाळगडा'वरून राजकारण तापलं आहे. विशाळगडाच्या पायथ्याशी झालेल्या तोडफोडीवरुन मुस्लिम समाजाने आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच त्यांनी संभाजीराजे छत्रपती यांना अटक करण्याची मागणी केली आहे.

Vishal Gangurde

रणजीत माजगावकर, साम टीव्ही प्रतिनिधी

कोल्हापूर : कोल्हापुरात विशाळगडावरून राजकारण तापलं आहे. विशाळगडाच्या पायथ्यांशी तोडफोड झाल्याची घटना घडली. दुसरीकडे या कामाविरुद्ध मुस्लिम समाजाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. विशाळगडाच्या पायथ्याला झालेल्या तोडफोडीवरून मुस्लिम समाजाने तीव्र निदर्शने केली. तसेच गजापूर येथे काल झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती यांना अटक करा, अशी मागणी मुस्लिम समाजाने केली आहे.

विशाळगडाच्या पायथ्याला झालेल्या तोडफोडीचा मुस्लिम समाजाने निषेध केला. तसेच संभाजीराजे छत्रपती यांना अटक करण्याचीही मागणी मुस्लिम समाजाने केली आहे. तसेच मुस्लिम समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील सादर करण्यात आलं. यावेळी मुस्लिम समाजातील व्यक्तींनी रस्त्यावर घोषणाबाजी केली. तसेच संभाजीराजे यांच्या अटकेसाठीही घोषणाबाजी केली.

अतिक्रमण काढण्यास सुरुवात

कोल्हापूरच्या विशाळगडावरील अतिक्रमण काढायला सुरुवात झाली आहे. कोल्हापूर जिल्हा प्रशासनाचे सर्व प्रमुख अधिकारी विशाळगडावर पोहोचले आहेत. तर जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस प्रमुख यासह प्रमुख अधिकारी विशाळगडावर पोहोचले आहेत. विशाळगडावरील अतिक्रमण केलेली दोन आस्थापने प्रशासनाने काढली आहेत.

खासदार शाहू छत्रपती करणार विशाळगडाची पाहणी

कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती विशाळगडाच्या परिसराची पाहणी करणार आहेत. शाहू महाराज मंगळवारी विशाळगडाच्या परिसराची पाहणी करणार आहेत. विशाळगड परिसरात नुकसान झालेल्यांना सरकारने तातडीने नुकसान भरपाई द्यावी. ही घटना म्हणजे जिल्हा प्रशासन आणि पोलिसांचे अपयश आहे. आम्ही घटनेपूर्वी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुखांना सूचना दिल्या होत्या. हिंसाचाराबाबत संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी खासदार शाहू छत्रपती यांचं प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

संभाजीराजे छत्रपती शाहूवाडी पोलीस ठाण्यात आक्रमक

संभाजीराजे छत्रपती शाहूवाडी यांनी पोलीस ठाण्यात आक्रमक भूमिका घेतली आहे. 'माझ्यावर गुन्हा दाखल झाला असेल तर मला त्वरित अटक करा. मी इथून उठणार नाही, अशी भूमिका संभाजीराजे छत्रपतींनी स्पष्ट केली.

दरम्यान, संभाजीराजे छत्रपती आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं फोनद्वारे संभाषण सुरू आहे. तसेच संभाजीराजे यांच्यावर शाहूवाडी पोलीस ठाण्यात अद्याप कुठलाही गुन्हा दाखल नसल्याची माहिती आली समोर आली आहे. विशाळगडावरील अतिक्रमण आणि काल झालेल्या घटनेबाबत संभाजीराजे आणि एकनाथ शिंदे यांच्यात फोनवरून संवाद सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मध्य रेल्वे धावत्या लोकलमधून महिला पडली

अमृता फडणवीसांकडून जेवणासाठी निमंत्रण; मनोज जरांगेंनी काय उत्तर दिलं? पाहा VIDEO

मी आरक्षण सोडण्यास तयार; केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान, पण ठेवली ‘ही’ अट

Main Door Vastu Tips: घराच्या दरवाज्याविषयी 5 महत्वाच्या गोष्टी प्रत्येकाला माहित असायला हव्यात

Ganesh Chaturthi 2026: यंदा गणपती बाप्पांचं आगमन ठरणार विशेष; हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी, जाणून घ्या पुजेचा मुहूर्त

SCROLL FOR NEXT