लातूरमध्ये धारधार शस्त्राने वार करून भरदिवसा तरुणाची हत्या दीपक क्षीरसागर
महाराष्ट्र

लातूरमध्ये धारधार शस्त्राने वार करून भरदिवसा तरुणाची हत्या

लातूर शहरातील सद्गुरूनगरमध्ये राधाकृष्ण मंदिराच्या पाठीमागील वस्तीत एक ३५ वर्षीय तरूणाचा दोन अज्ञात मारेकर्‍यांनी दिवसाढवळ्या कत्ती आणि चाकूचे सपासप वार करून निर्घून खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

दीपक क्षीरसागर

लातूर : लातूर शहरातील सदगुरूनगरमधील राधाकृष्ण मंदिराच्या पाठीमागील वस्तीत रस्त्यावर एक ३५ वर्षीय तरूणाचा दोन अज्ञात मारेकर्‍यांनी दिवसाढवळ्या कत्ती आणि चाकूचे सपासप वार करून निर्घून खून केल्याची खळबळजनक घटना आज दुपारी सव्वा तीनच्या दरम्यान घडली आहे. या घटनेमुळे शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हे देखील पहा -

गोकूळ मंत्री असे या खून झालेल्या युवकाचे नाव असल्याचे सांगण्यात येत आहे. या खूनाच्या घटनेने संपूर्ण लातूर शहर हादरले आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी पंचनामा करून गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. आज दुपारी ३.१५ वाजण्याच्या सुमारास दादोजी कोंडदेवनगरात राहणारा गोकूळ मंत्री नामक ३५ वर्षीय इसम आपल्या एमएच २४ बीए ४३३९ या स्पेलंडर दुचाकीवरून घराबाहेर पडला होता. त्यासोबत दोन वीस-बावीस वर्षीय दोन तरूण त्याच्या दुचाकीवर बसून जात होते.

त्याच तरूणांनी सदगुरू नगरात आल्यानंतर राधाकृष्ण मंदिराच्या मागील वस्तीतील रस्त्यावर गोकूळ मंत्री याच्या शरीरावर, डोक्यात, पाठीत चाकू व कत्तीने सपासप वार करून निर्घृणपणे खून केला आणि मारेकर्‍यांनी तेथून पळ काढला. अशी चर्चा सद्गुरु नगरात जमलेले प्रत्यक्षदर्शी दबक्या आवाजात सांगत होते. या घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनिलकुमार पुजारी हे पोलिस ताफ्यासह घटनास्थळी हजर होऊन पंचनामा केला असून मयताचे प्रेत शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवून देण्यात आले आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुुरु आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandardara Dam : भंडारदरा व निळवंडे धरण ओव्हरफ्लो; पाण्याचा विसर्ग वाढविल्याने प्रवराला मोठा पूर

Google Calling Update: तुमची पण कॉलिंग स्क्रीन बदलली आहे? जुनी स्क्रीन हवी आहे? मग आताच करा 'ही' सेटिंग

Ukdiche Modak: घरच्या घरी उकडीचे मोदक कसे बनवायचे?

Maharashtra Live News Update: छत्रपती संभाजीमध्ये कार खड्ड्यात गेली, चालक गंभीर जखमी

Ganeshotsav : गणेशभक्तांवर वेगळंच संकट! ऑर्डर पूर्ण करू शकला नाही, मूर्तिकार अचानक गायब, मूर्तीसाठी धावाधाव

SCROLL FOR NEXT