BMC Election 2022 Saam TV
महाराष्ट्र

उत्सुकता आणि धाकधूक! मुंबईसह 14 महानगरपालिकांसाठी आज आरक्षण सोडत

आरक्षणाची सोडत आज वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात होणार आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई: सर्वांचचं लक्ष लागून असलेल्या महापालिका निवडणुकांचे (Municipal Election) आज खऱ्या अर्थाने बिगुल वाजणार आहे. कारण, मुंबईसह (Mumbai) राज्यातील 14 महानगरपालिकांच्या (BMC Election 2022) प्रभागांसाठी आज आरक्षण (Reservation) सोडत काढण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्ष, इच्छुक उमेदवारांसह संपूर्ण राज्याचं लक्ष याकडे लागून आहे. आरक्षणाची सोडत आज वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात होणार आहे. सकाळी ११ वाजता प्रभागांच्या सोडत निघणार असून, प्रशासनाकडून युद्धपातळीवर तयारी सुरू आहे. (Municipal Election Reservation Latest News)

मुंबई, नवी मुंबई, वसई विरार, उल्हासनगर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, नागपूर, सोलापूर, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, कल्याण डोंबिवली आणि ठाणे महापालिकांचा समावेश आहे. महापालिकांच्या आरक्षण सोडतीचा हा कार्यक्रम ३१ मे ते १३ जूनपर्यंत सुरू राहणार आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने ४ मे रोजी दिलेल्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने मुंबईसह राज्यातील १४ महापालिकांना ३१ मेपर्यंत आरक्षण सोडत काढण्याचे निर्देश दिले आहेत. मुंबईत यंदा नऊ प्रभागांची वाढ होऊन २२७ वरून २३६ प्रभाग झाले आहेत. त्यामुळे यंदा आरक्षणात काही जागांची वाढ होऊ शकते.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महिलांना ५० टक्के आरक्षण आहे. पालिकेत या आरक्षणात महिला अनुसूचित जाती आणि जमाती व सर्वसाधारण महिला यांच्यासाठी सोडत काढली जाणार आहे. यानंतर आरक्षणावर हरकती आणि सूचना नोंदविण्यासाठी मुंबईतील २४ प्रभागांमध्ये यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे.

मुंबई महापालिकेतील प्राधान्यक्रम असा राहणार

प्राधान्यक्रम १ – मागील तीन निवडणुकांत महिलांना आरक्षण नसल्यास यावेळी महिलांना प्राधान्य

प्राधान्यक्रम २ – २००७ च्या निवडणुकीत महिलांना राखीव होता, पण २०१२ आणि २०१७ मध्ये नसल्यास महिलांना प्राधान्य

प्राधान्यक्रम ३ – २००७ मध्ये राखीव होता मात्र २०१२ व २०१७ मध्ये नसल्यास आरक्षणासाठी प्राधान्य देण्यात येईल.

महिला–पुरुष ५०-५० टक्के

एकूण वॉर्ड – २३६ (१५ वॉर्ड अनुसूचित जाती, २ वॉर्ड अनुसूचित जमाती)

महिला – ११८ पुरुष – ११८

नागपूर महानगरपालिका आरक्षण सोडत

दुसरीकडे आज नागपूर महानगरपालिकेची त्रिस्तरीय प्रभाग पद्धतीनुसार लोकसंख्येच्या आधारावर अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या उमेदवारांची आरक्षण सोडत निघणार आहे. लोकसंख्येच्या उतरत्या क्रमानुसार अनुसूचित जातीच्या 31 व अनुसूचित जमातीच्या 12 जागेसाठी ही सोडत असणार आहे. नागपूर महानगरपालिकेत 52 प्रभाग असून त्यासाठी 156 नगरसेवक असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नाशिकच्या निफाड तालुक्यातील गावांना पावसाचा फटका

'पप्पा मला अ‍ॅडमिशन घेऊन द्या ना'; पैशांअभावी वडिलांचा थांबण्याचा सल्ला; घरी कुणी नसताना लेकीनं आयुष्य संपवलं

Nashik News: नाशिकमध्ये धो धो! गोदामातेची पुरातच आरती, भक्तांची मांदियाळी|VIDEO

Skin Care Tips: पावसाळ्यात ग्लोइंग त्वचा हवीये, मग फॉलो करा 'या' सिंपल टिप्स

Shubman Gill : शुभमन गिलकडून झाली मोठी चूक! भारताच्या कॅप्टनचा 'तो' व्हिडीओ लीक, बीसीसीआयला फटका बसणार?

SCROLL FOR NEXT