Municipal Corporations Election Saam TV
महाराष्ट्र

Municipal Corporations : महापालिकांच्या निवडणुका आणखी लांबणीवर? नव्याने होणार प्रभाग रचना

राज्यातील महानगरपालिकेच्या निवडणुका आणखी लांबीवर पडण्याची शक्यता आहे.

डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद : राज्यातील महानगरपालिकेच्या निवडणुका आणखी लांबीवर पडण्याची शक्यता आहे. कारण औरंगाबादसह राज्यातील २४ महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी नव्याने प्रभाग रचना करण्याचे आदेश नगरविकास विभागाने महापालिका आयुक्तांना दिले आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे महापालिकांच्या निवडणुका आणखी लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांबाबत (Municipal Election) सर्वोच्च न्यायालयात पुढील आठवड्यात सुनावणी होणार असतानाच राज्य सरकारने आधीच्या महाविकास आघाडीने सरकारने तयार केलेली प्रभाग रचना नव्याने बदलण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईसह राज्यातील २४ महानगरपालिका निवडणुकीसाठी नव्याने प्रभाग रचना करण्याचे आदेश नगरविकास विभागाने मंगळवारी काढले.

मुदत संपलेल्या आणि नजीकच्या काळात मुदत संपत असलेल्या महानगरपालिकांच्या आगामी निवडणुकीसाठी २०११च्या जनगणनेनुसार प्रभागांची संख्या रचना निश्चित करून प्रभाग रचनेचे प्रारूप तयार करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तत्काळ सुरू करण्यात यावी, अशा सूचना नगरविकास विभागाने संबंधित महापालिका आयुक्तांना दिल्या आहेत.

कोणकोणत्या महानगरपालिकांची प्रभाग रचना?

मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, वसई- विरार, पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, अकोला, अमरावती, नागपुर, औरंगाबाद, नांदेड- वाघाळा, लातूर, परभणी, चंद्रपूर, भिवंडी निजामपूर, मालेगाव, पनवेल, मीरा भाईंदर या २३ महापालिकांची मुदत संपली आहे. तेथे सध्या प्रशासक कारभार पाहत आहेत. तर नव्याने महापालिका झालेल्या इचलकरंजी महापालिकेची प्रथमच निवडणूक होईल. त्यामुळे सध्या राज्यातील २८ पैकी २४ महापालिकांसाठी नव्याने प्रभाग रचना करण्यात येईल.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध

Dharmarakshak Mahaveer Chhatrapati Sambhaji Maharaj : 'आईविना जगण किती अवघडं असतं' धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज ट्रेलर प्रदर्शित

घरबसल्या अनुभवा ॲक्शनचा धमाका; 'Kanguva' आता ओटीटीवर, कधी अन् कुठे पाहाल

Wedding Rituals Varmala Cermony: लग्नात वर-वधूला वरमाला का घालतात? नेमकं कारण काय, जाणून घ्या...

हे आहेत डोके आणि मानेचे प्रमुख कर्करोग, प्रतिबंधासाठी जीवनशैलीत करा हे बदल...

SCROLL FOR NEXT