Beed Politics News Saam Tv News
महाराष्ट्र

बीडमध्ये राजकीय भूकंप! मुंडेंचा भाजपला रामराम; राष्ट्रवादी अजित दादांसोबत जाण्यामागचं सांगितलं कारण

Munde Father-Son Duo Quits BJP: वडवणीतील मुंडे पिता-पुत्रांनी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. बाबरी मुंडेंकडून प्रसारमाध्यमांसमोर मनातील खदखद व्यक्त.

Bhagyashree Kamble

  • मुंडे पिता-पुत्रांनी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

  • बाबरी मुंडेंकडून प्रसारमाध्यमांसमोर मनातील खदखद व्यक्त.

  • अजित पवार यांच्या उपस्थितीत ७ ऑगस्ट रोजी बीडमध्ये पक्षप्रवेश सोहळा होणार आहे.

  • स्वागताच्या फ्लेक्सवर धनंजय मुंडे यांचा फोटो नसल्यामुळे, त्यांना डावलल्याची जोरदार चर्चा.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात मोठा राजकीय भूकंप होणार आहे. बीडच्या वडवणीतील मुंडे पिता पुत्रांनी पंकजा मुंडेंची साथ सोडली आहे. भाजपला रामराम ठोकत त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात पक्षप्रवेश करणार असल्याचा निर्णय घेतला आहे. या पक्षप्रवेशाबाबत बाबरी मुंडेंनी प्रतिक्रिया दिली आहे. एकनिष्ठ काम करूनही न्याय मिळत नसेल तर, पक्षात थांबून उपयोग काय? असं ते म्हणालेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड दौऱ्यावर आहेत. दौऱ्यावर असताना अजित पवारांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम पार पडणार आहेत. अनेक बैठकांमध्ये ते उपस्थितीत राहतील. तसेच अजित पवारांच्या उपस्थितीत आज राजाभाऊ मुंडे आणि त्यांचा मुलगा बाबरी मुंडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात जाहीर प्रवेश होणार आहे.

यापक्षप्रवेशापूर्वी बाबरी मुंडे यांनी मनातील खदखद प्रसारमाध्यमांसमोर व्यक्त केली. स्थानिक लेव्हलच्या निवडणुकांमध्ये नेते आणि पक्ष लक्ष घालत नसल्यामुळे आपण पक्ष सोडत असल्याचं मुंडे म्हणाले. 'पक्षासाठी खूप काम केलंय. संघर्षाच्या काळामध्ये आम्ही पक्षासोबत राहिलो. एकनिष्ठ काम केलं. मात्र, एकनिष्ठ काम करूनही न्याय मिळत नसेल तर, पक्षात थांबून उपयोग काय', असं बाबरी मुंडे म्हणाले.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये मुंडे पिता पुत्र ७ जुलै रोजी प्रवेश करणार आहेत. माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश करत असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच पुढील ध्येय, धोरण आणि राजकीय वाटचाल प्रकाश सोळंके सांगतील त्याप्रमाणे करू, असंही मुंडे म्हणाले.

मुंडे पिता पुत्रांच्या पक्षप्रवेशाची बीडमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडत असल्यामुळे या पक्षप्रवेशाला अधिक महत्व आहे. जिल्ह्यात अजित पवारांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी फ्लेक्स आणि बॅनर लावण्यातआले आहे. मात्र,  स्वागताच्या बॅनरवर धनंजय मुंडे यांचा फोटो नसल्यामुळे बीडमध्ये चर्चेला उधाण आलं आहे. माजी मंत्री धनंजय मुंडे यांना डावलून पक्षप्रवेश सोहळा होणार असल्याची माहिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : “किती बी समोर येऊ द्या, एकटा बास”, भास्कर जाधव यांच्या स्टेटसने वादाला मिळाली नवी फोडणी

Accident News : बस- कारचा भीषण अपघात; कारमधील दोघे गंभीर जखमी

Jalebi History : जिलेबीचा उगम भारतात नव्हे, तर या देशात! वाचा गोड इतिहास एका क्लिकवर

MNS: 'नरेस, सुरेस, परेस, चड्डीत राहायचं!', मनसेचा अमराठी भाषिकांना इशारा; संदीप देशपांडेंच्या टी-शर्टने वेधलं लक्ष

Rinku Rajguru: में ख़ुद अपनी तलाश में हूँ...; रिंकू राजगुरुचे रॉयल लूक फोटो पाहिलेत का?

SCROLL FOR NEXT