Samruddhi Mahamarg Accident News Saam TV
महाराष्ट्र

Samruddhi Highway Accident : अतिवेग जीवावर बेतला! समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; पती-पत्नीचा जागीच मृत्यू

Samruddhi Accident News : समृद्धी महामार्गावर आणखी एक भीषण अपघात झाला आहे.

Satish Daud

संजय जाधव साम टीव्ही, बुलढाणा

Samruddhi Mahamarg Accident News : गेल्या काही दिवसांपासून समृद्धी महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढलं आहे. दररोज समृद्धी महामार्गावर किरकोळ आणि भीषण अपघात होत आहे. एकीकडे महामार्गावरील अपघात कमी करण्यासाठी परिवहन विभागाने गांधीगिरी सुरू केली असताना, दुसरीकडे समृद्धी महामार्गावर आणखी एक भीषण अपघात झाला आहे. (Breaking Marathi News)

बुलढाणा जिल्ह्यातील दुसरबीड जवळ समृद्धी महामार्गावरील नागपूर कॉरिडॉरवर आज सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास एका कारचा भीषण (Accident) अपघात झाला आहे. पुण्याहून नागपुरच्या दिशेने भरधावर वेगात जाणारी एक कार दुसऱ्या कारला पाठीमागून धडकली.

या भीषण अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर कारचालक मुलगा गंभीर जखमी झाला आहे. त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आमित पाध्ये आणि ईश्वरी पाध्ये अशी मृत्युमुखी पडलेल्या पती पत्नीची नावे आहेत. तर आशिष पाध्ये असं गंभीर जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, पाध्ये कुटुंब काही कामानिमित्त पुण्याला (Pune) गेले होते. पुण्याहून परत येत असताना, बुलढाणा जिल्ह्यातील दुसरबीड जवळ समृद्धी महामार्गावरील नागपूर कॉरिडॉरवर समोर जाणाऱ्या कारला त्यांच्या कारने जोरदार धडक दिली.

ही धडक इतकी भीषण होती, की यामध्ये कार जागीच उलटली. या भीषण अपघातात (Samruddhi Mahamarg Accident) आमित पाध्ये आणि ईश्वरी पाध्ये यांचा जागीच मृत्यू झाला. तर कारचालक मुलगा आशिष पाध्ये हा गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृत पती-पत्नीचे मृतदेह आपल्या ताब्यात घेतले. तर आशिष पाध्ये याला सिंदखेड राजा येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : भाजपचे माजी आमदार वैभव पिचड यांना अश्रू अनावर

Nevasa Vidhan Sabha : माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांची भाजपमधून हकालपट्टी; बंडखोरी करत भरलेला अर्ज कायम ठेवल्याने कारवाई

Mobile In Marathi: मोबाईलला मराठीत काय म्हणतात?

Zodiac Sign: या राशीचे लोक असतात स्वार्थी; एका मिनिटांत विश्वासघात करतात

Tiger Nuts: टायगर नट्स कधी खाल्ले आहेत का? जाणून घ्या फायदे

SCROLL FOR NEXT