Rooftop pigeon shelters in Mumbai continue despite High Court ban, raising health and legal concerns. Saam Tv
महाराष्ट्र

Pigeon Shelters: हायकोर्टाचा आदेश धुडकावून मुंबईत टेरेसवर कबुतरखाने

Court Orders Ignored: उच्च न्यायालयाचा आदेश धुडकावून मुंबईत वेगळ्या पद्धतीने कबुतरखाने चालवले जात आहेत... मात्र कबुतरांना खायला कसं टाकलं जातंय?

Suprim Maskar

हायकोर्टाच्या आदेशानंतरही कबुतरांना दाणे टाकणं सुरूच आहे. दादरच्या कबुतरखान्यांच प्रकरण थेट न्यायालयापर्यत पोचलं आणि कबुतरखाना बंद झाला...मात्र त्यानंतर जैन समाजानं भूतदया करण्याचा वेगळा मार्ग निवडलाय.. कुणी गाडीच्या छतावर कबुतरांसाठी दाणे ठेवले तर कुणी चौपाट्यांवर जाऊन कबुतरांना दाणे टाकले..हे कमी की काय म्हणून आता दादर परिसरात इमारतींच्या टेरेसवर नव्यांने कबुतरखाने सुरू झाले आहेत...

कबुतरखान्याच्या बंदीवरील हायकोर्टाच्या आदेशानंतर जैन समाज चांगलाच आक्रमक झाला होता. जैनमुनींनीही या वादात उडी घेत आरोग्याशी निगडीत या विषयाला धार्मिक वळण दिलं.. त्यानंतर मराठी एकीकरण समितीही कबुतरखानाबंदीच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरली..मात्र कबुतरखाना बंदीचा आदेश कायम राहिला.. मात्र या आदेशाला धुडकावत जैन समाजाकडून इमारतीच्या टेरेसवर कबुतरांवरची भूतदया कायम आहे.

एकीकडे कबुतरखाना बंदीचा आदेश न्यायालयानं दिलेला असताना दुसरीकडे पालकमंत्री मंगलप्रभात लोढांनी थेट संजय गांधी नॅशनल पार्कमध्येच नव्या कबुतरखान्याचं उद्धाटन केलयं..मुंबईतील कबुतरखाने बंद करण्याएवजी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे कबुतरखाने उभारून कोर्टाच्या आदेशालाच पायदळी तुडवले जातंय का?... या कबुतरांमुळे भविष्यात नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला कोण जबाबदार असेल? याचं उत्तर भूतदयेच्या नावाखाली आरोग्याशी खेळणाऱ्यांनी नक्कीच द्यायला हवं...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur : ऐन दिवाळीत दिवाळे! महाराष्ट्रातील या बँकेवर RBI चे कठोर निर्बंध, पैशांचं काय होणार?

Housing Society Elections : गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणूका ऑनलाइन होणार; सरकारनं नेमका काय निर्णय घेतलाय? VIDEO

Maratha vs OBC Row : 'अजित पवारांनी साप पोसलेत' भुजबळांनंतर जरांगेंचा अजित पवारांवर हल्लाबोल

KDMC : कल्याणमधील कचरा संकलनाचा ठेका किती कोटींचा? अधिकाऱ्यांनाच ठाऊक नाही, पालिकेत नेमकं काय घडतंय?

Rohit Sharma : रोहित शर्माचं वाढलेलं पोट सपाट, 'हिटमॅन' झाला फीटमॅन

SCROLL FOR NEXT