jarendeshwar sugar factory saam tv
महाराष्ट्र

Jarandeshwar Sugar Factory: जरंडेश्वर साखर कारखान्याच्या संचालकांना मोठा दिलासा; मुंबई सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर

Satara Jarandeshwar Sugar Factory News: आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी 'ईडी'ने जप्तीची कारवाई केलेल्या जरंडेश्वर साखर कारखान्याच्या संचालकांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे.

Gangappa Pujari

सचिन गाड, प्रतिनिधी....

Jarandeshwar Sakhar Karkhana: आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी 'ईडी'ने जप्तीची कारवाई केलेल्या साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्याच्या संचालकांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने कारखान्याचे संचालक सचिन सिनगारे व गुरू कमोडिटीजचे जवाहरलाल छाजेड, सीए योगेश बगरेचा यांचा जामीन मंजूर केला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, साताऱ्यातील (Satara) जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना हा २०१० साली लिलावात काढण्यात आला होता. हा कारखाना गुरू कमोडिटी प्रा. लि. या कंपनीने अवघ्या ६५ कोटी ७४ लाखाला विकत घेतला. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेने सुमारे ९६ कोटी रुपयांचे कर्ज जरंडेश्वर साखर कारखान्याला दिले होते.

कारखान्याची मूळ किंमत कमी असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात या बँकांनी कर्ज दिल्याचे समोर आल्यानंतर 'ईडी'ने याप्रकरणी जप्तीची कारवाई केली. तसेच संचालकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी जामीन मिळावा, यासाठी कारखान्याचे संचालक सचिन सिनगारे व गुरू कमोडिटीजचे जवाहरलाल छाजेड, सीए योगेश बगरेचा यांनी मुंबई सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.

याप्रकरणी जामीन मिळावा, यासाठी कारखान्याचे संचालक सचिन सिनगारे व गुरू कमोडिटीजचे जवाहरलाल छाजेड, सीए योगेश बगरेचा यांनी मुंबई सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.

न्यायालयाने प्रत्येकी दोन लाखांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजुर केला आहे. मात्र आरोपींनी देश सोडून जाऊ नये, पुराव्याशी छेडछाड करू नये, साक्षीदारांवर दबाव टाकू नये अशा अट लावण्यात आल्या आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

1500 लोकांचा मृत्यू, 5 मिनिटांत बॉडी गायब; गडचिरोलीतील मृत्यूंबाबत राऊतांचा मोठा आरोप

मूड खराब झाल्यास मिळणार सुट्टी; भारतातही पॉलिसी राबवणार, उद्योगपतींचे संकेत

जरांगे प्रवास करत असलेल्या डिफेंडरवरून वाद; महागड्या गाडीतून जरांगेंचा आरक्षण दौरा

सरकारी-खासगी शाळा दिपकेंच्या रडारवर ; CJPचं शाळा सुधार आंदोलन

Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट; राज्य सरकारनं मराठा समाजासाठी घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT