Praniti Shinde News: PM मोदींचे चंद्रयानाशी काय देणंघेणं? प्रसिद्धी घ्या, पण...; आमदार प्रणिती शिंदेंची जोरदार टीका

Praniti Shinde News: 'पंतप्रधान मोदींचे चंद्रयानाशी काय देणंघेणं आहे. तुम्हाला प्रसिद्धी हवी असेल तर घ्या. मात्र आमच्या बांधवांना न्याय द्या, अशा शब्दात आमदार प्रणिती शिंदेंनी टीका केली आहे.
Praniti Shinde News
Praniti Shinde NewsSaam tv
Published On

Praniti Shinde Latest News In Marathi :

सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीकास्त्र सोडलं. भारताचं चंद्रयान मोहीम यशस्वी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला संबोधित केलं होतं. यावरून काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी टीका केली आहे.

'पंतप्रधान मोदींचे चंद्रयानाशी काय देणंघेणं आहे. तुम्हाला प्रसिद्धी हवी असेल तर घ्या. मात्र आमच्या बांधवांना न्याय द्या, अशा शब्दात आमदार प्रणिती शिंदेंनी टीका केली आहे. (Latest Marathi News)

सोलापुरात मातंग एकता आंदोलन आणि शहर उत्तर युवक काँग्रेसच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे गौरव पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात आमदार प्रणिती शिंदे बोलतं होत्या.

Praniti Shinde News
Cm Eknath Shinde News: राज्यातील दुष्काळग्रस्त भागांना पाणी पुरविणाऱ्या प्रकल्पांना केंद्र सरकारने मदत करावी: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

यावेळी बोलताना प्रणिती शिंदे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावरही निशाणा साधला. 'मागासवर्गीयांचा आवाज काँग्रेस पक्ष आहे. बाकी लोक निवडणुकीपुरतं येतात आणि जातात. त्यामुळे रक्तापेक्षा विश्वासाचे नाते महत्त्वाचे आहे, अशा शब्दात काँग्रेसच्या सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला.

आमदार प्रणिती शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. मागासवर्गीयांना जेव्हा न्याय मिळतो. त्यावेळेस लोकशाही खंबीर होत असते. मात्र आज उलट होताना दिसत आहे. लोकशाहीत मागासवर्गीयांचा आवाज दाबला जात आहे. त्यामुळे लोकशाहीची हत्या होते की काय असा प्रश्न मला पडतो. विरोधकांना बोलू न देणे, मागासवर्गीयांवर होणाऱ्या अत्याचारावर न बोलता त्याचे समर्थन करत आहेत, असेच पंतप्रधान मोदी करतच आहेत'.

Praniti Shinde News
Beed News: नेत्यांची भाषणं, लोकांना पटेनात! ठोस घोषणा जाहीर न केल्यानं लोकांमध्ये निराशा

'मणिपूर जळत आहे, मात्र त्याबाबत काहीही बोलले नाहीत. मात्र ज्यावेळेस चंद्रयान लँड झाले, ज्याचे श्रेय शास्त्रज्ञांना जाते. परंतु चंद्रयान लँड होत असताना पंतप्रधान मोदी अचानकमध्ये येतात. बिचारे कष्ट करणारे शास्त्रज्ञ बॅक ड्रॉपला गेले. मोदी यांचे चंद्रयानाशी काय देणंघेणं आहे. तुम्हाला प्रसिद्धी हवी असेल तर घ्या. मात्र आमच्या बांधवांना न्याय द्या, अशा शब्दात आमदार प्रणिती शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com