Railway workers’ protest at CSMT turned tragic as three passengers lost their lives at Sandhurst Road station questions mount over Central Railway’s negligence. Saam Tv
महाराष्ट्र

रेल्वेचे खुनी कर्मचारी,आठ प्रवाशांचे हत्यारे मोकाट, माजुरड्या कर्मचा-यांवर कारवाई कधी?

Angry Railway Employees Blamed: सँण्डहर्स्ट रोडवर रेल्वे अपघातात तीन जणांचा दुर्देवी मृत्यू झालाय... मात्र या अपघाताला नेमकं कारणीभूत कोण आहे? रेल्वेच्या आंदोलनामुळे नेमकं काय घडलं? रेल्वे प्रशासनानं नेमकं काय स्पष्टीकरण दिलयं.

Snehil Shivaji

दैव बलवत्तर म्हणून रेल्व अपघातात वाचलेला कैफ...

मस्तवाल रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानं गुरुवारी तीन कुटुंब उद्धवस्त झाली.

हत्याऱ्यांना वाचवण्यासाठी रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी पुन्हा 3 जणांची हत्या केली. होय हत्याच केली. भर गर्दीच्या वेळी लाखो मुंबईकरांना वेठीस धरणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांनी गुरूवारी आंदोलन करत ज्याच्यावर त्यांची पोट भरली जातात तीच लोकल बंद पाडली.

मुंब्र्यात लोकल एकमेकांना घासल्यानं झालेल्या अपघातात ५ प्रवाशांचा मृत्यूप्रकरणी दोन इंजिनिर्सवर कारवाई होणार होती. या कारवाईच्या निषेधार्थ गुरुवारी मध्य रेल्वे कर्मचाऱ्यांनी CSMT स्थानकावर आंदोलन केलं. घरी जायच्या वेळेस लोकलसेवा ठप्प झाल्यानं हजारो प्रवासी रेल्वे रुळावरुन चालत निघाले. यावेळी अंबरनाथ फास्ट लोकलने रुळावरुन चालणाऱ्या अनेक प्रवाशांना उडवलं त्यात ३ प्रवाशांचा मृत्यू झाला तर काही जखमी झाले.

मुंब्रा अपघात प्रकरणानंतर रेल्वे प्रशासनावर टिकेची झोड उठली होती. या अपघातानंतर झालेल्या चौकशीत २ अभियंते दोषी ठरले ठरल्यानं त्यांना अटक होणार होती. आणि केवळ कारवाई टाळावी म्हणून लाखो प्रवाशांना वेठीस धरण्याचा प्रयत्न रेल्वे कर्मचाऱ्यांनी केला. त्यांनी चक्क मोटरमन्सना कोंडून ठेवत गर्दीच्या वेळी सुनियोजित कट रचुन परवानगी न घेता हे आंदोलन केलं. याच आंदोलनामुळे सँण्डहर्स्ट रोडवर हा अपघात झाला.

भारतात पहिली रेल्वे सुरु होऊन १७३ वर्ष झाली. मात्र आजही मस्तवाल कर्मचाऱ्यांच्या कारभारामुळे ट्रेन वेळेवर धावत नाही. त्यामुळे प्रवाशांचा रोजचा संघर्ष हा सुरुच असतो. गुरूवारचं आंदोलन प्रत्येकाच्या तळपायाची आग मस्तकात नेणारं होतं. या दुर्घटनेनंतर साम टिव्हीनं मुंबईकर प्रवाशांच्या वतीनं सवाल उपस्थित केलेत.

सामचा सवाल

अहवालात दोषी आढळलेल्या कर्मचाऱ्यांचा बचाव का केला जातोय?

गर्दीच्या वेळी आंदोलनाला परवानगी कोणी आणि का दिली?

आरोपींना वाचवण्यासाठी मुंबईला वेठीस धरणाऱ्यांवर अद्याप कारवाई का केली नाही?

रेल्वे प्रशासनाला प्रवाशांच्या अडचणींचं सोयरं सुतक नाही का?

हेच आंदोलन सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांनी केलं असतं तर रेल्वेनं त्यांच्यावर गंभीर स्वरूपाची कलमं लावून त्यांना कोर्टांच्या पायऱ्या झिजवण्यास भाग पाडलं असतं. खरंतर कालच्या प्रकरणानंतर आंदोलक कर्मचाऱ्यांचं तत्काळ निलंबन करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करणं गरजेचं आहे. पण निगरगट्ट रेल्वे प्रशासनानं आपल्या सुमार दर्जाच्या सेवेप्रमाणेच इथेही कुचकामीपणा दाखवलाय. मात्र रेल्वेच्या या दुटप्पी कारभाराच्या विरोधात इथेही एखादं आंदोलन चिघळलं तर रेल्वेच्या सरकारी बाबूंना पळता भुई थोडी होईल हे नक्की.

रेल्वेच्या विरोधात आंदोलन करणं किंवा या कर्मचाऱ्यांना जाब विचारणाऱ्या अनेकांना याच रेल्वे प्रशासनानं गुन्हे दाखल करुन तुरुंगात टाकलंय. परंतू रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी खूनी आंदोलन करुनही त्यांच्यावर अद्याप गुन्हा दाखल का केला नाही हा सवाल आहे. पण तरीही अजून रेल्वेच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई झालेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र, बीबीएफ यंत्रासाठी अनुदान मिळणार; कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा

Maharashtra Politics: ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंना मोठा धक्का; निष्ठावंत नेत्यानं सोडली साथ

Maharashtra Live News Update: मुद्रांक शुल्क आणि त्यावरचा दंड भरल्यावरच व्यवहार पूर्णपणे रद्द होणार

Manoj Jarange: जरांगेंच्या हत्येचा कट? एक-दोन नव्हे, तीन-तीन प्लान आले समोर

Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; धडकेनंतर कारनं घेतला पेट, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT