Mumbai-Pune express way  Saam TV
महाराष्ट्र

Mumbai-Pune express way : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर २ तासांचा मेगाब्लॉक; वाचा वेळ आणि पर्यायी मार्ग

Mumbai Pune express way traffic block today : आज (२३ एप्रिल) मुंबई पुणे एक्स्प्रेसवर २ तासांसाठी ब्लॉक असणार आहे. या वेळेत सर्व वाहनांना या मार्गावरून प्रवास करता येणार नाहीये.

Ruchika Jadhav

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. आज (२३ एप्रिल) मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर २ तासांसाठी मेगाब्लॉक असणार आहे. या वेळेत लहान, मोठ्या अशा सर्व वाहनांना या मार्गावरून प्रवास करता येणार नाहीये.

मेगाब्लॉकची वेळ काय?

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर गॅन्ट्री बसवण्याचे काम बाकी आहे. त्या कामासाठी दोन तासांचा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. दुपारी १२ ते २ या वेळेत मुंबई- पुणे मार्गिकेवरील सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करून मुंबई आणि पुणे गाठावं लागणार आहे.

पर्यायी मार्ग कोणते?

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरून प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी पर्यायी मार्ग देण्यात आले आहेत. पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांसाठी मुंबई वाहिनीवर ५५ किमी किलोमीटरच्या लेनवर डायव्हर्जन पॉइंट तयार करण्यात आला आहे.

डायव्हर्जन पॉइंटवरून वाहने मुंबईकडे वळवण्यात आली आहेत. जुन्या पुणे-मुंबई महामार्गाचा वापर करून पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८, खोपोलीपासून मुंबई वाहिनीमार्गे शेडुंग टोलनाक्यावरून वाहने सोडली जातील.

मेगा ब्लॉकचे कारण काय?

मुंबई पुणे एक्सप्रेसवरुन दररोज अनेक प्रवासी प्रवास करतात. दरम्यान, अनेकदा वाहतूक कोंडींच्या समस्यांचा देखील सामना करावा लागतो. त्यामुळे एक्सप्रेसवेवर आवश्यक पायाभूत सुविधा असाव्यात यासाठी विकास कामे सुरू आहेत.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील तात्पुरता ट्रॅफिक ब्लॉक गॅन्ट्री बसवण्यासाठी ब्लॉक घेण्यात येत आहे. महामार्ग वाहतूक व्यवस्थापन प्रणालीचा एक भाग म्हणून, पुणे ते मुंबई या वाहिनीवर १९.१०० किलोमीटर अंतरावर गॅन्ट्री बसवण्याचे काम केले जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : जिगरी यार गद्दार निघाला! रात्री बायकोसोबत बेडवर; रागात नवऱ्याने मित्राचा गळाच चिरला

पुण्याचा दुसरा मानाचा तांबडी जोगेश्वरी गणपती पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जित|VIDEO

Shreyas Iyer captain : श्रेयस अय्यर कर्णधार, बीसीसीआयचा मोठा निर्णय; संघाचीही घोषणा

Shocking : शरीर संबंधास दिला नकार, तरूणाने होणाऱ्या बायकोवर बलात्कार केला अन् जीव घेतला, पालघरमधील भयानक घटना

Krutika Deo: सुंदरा असावी कशी अप्सरा जशी...; कृतिका देवचा मनमोहक लूक पाहिलात का?

SCROLL FOR NEXT