Maharashtra News Live Update Saam TV Marathi
महाराष्ट्र

Maharashtra News Live Update: धबधब्यावर पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू

Marathi Breaking Live Headlines Updates : मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, पुणे, पिंपरी-चिंचवड पावसाचा रेड अलर्ट, राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, राज्यासह देश विदेशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Priya More

धबधब्यावर पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू

नाशिक जिल्ह्यात आज काही तालुके वगळता अनेक भागात सकाळ पासून मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरू होता.चांदवड व देवळा तालुक्यातील डोंगररांगा मधून उंचावरून वाहणाऱ्या चोर चावडी नावाच्या धबधब्यावर पोहण्यासाठी चांदवड येथून काही मित्र गेले असता त्यात वडगाव-पंगू येथील 22 वर्षीय ऋषिकेश संसारे याचा पाण्यात बुडवून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून,या घटनेची माहिती देवळा पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले,पाण्यात बुडालेल्या तरुणाचा सध्या शोध सुरू असून संध्याकाळी उशिरा पर्यंत त्याचा मृतदेह सापडला नसल्याचे समजते.

ठाण्यातील यशोधन नगर परिसरात चारचाकी वाहनावर झाड कोसळलं

वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून जखमीच्या पाठीला गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहे..

नाशिक जिल्ह्यातील हायअलर्टचे बहुतांश निर्बंध उद्या (८ जुलै) सकाळी ६ वाजल्यापासून शिथिल

नाशिक -

- *नाशिक जिल्ह्यातील हायअलर्टचे बहुतांश निर्बंध उद्या (८ जुलै) सकाळी ६ वाजल्यापासून शिथिल*

- जिल्हा प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय

- *मात्र धबधबे, ट्रेकिंग पॉइंट आणि पर्यटनस्थळांवर १३ जुलैपर्यंत बंदी कायम*

- पर्यटकांना बंदी आदेशाचे पालन करण्याचे आवाहन

- *उद्यापासून त्र्यंबकेश्वर मंदिरही भाविकांसाठी पुन्हा खुले होणार*

- प्रशासनाकडून परिस्थितीवर सातत्याने राहणार लक्ष, नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन

कल्याण न्यायालय परिसरात झाड कोसळून वकिलाच्या कारचे नुकसान

कल्याण डोंबिवलीत सततच्या मुसळधार पावसामुळे कल्याण जिल्हा न्यायालय परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असून वकील, पक्षकार आणि नागरिकांना न्यायालयात ये-जा करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. जलनिस्सारण मार्गावर कचरा साचल्याने पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याचे समोर आले आहे.

डोंबिवली स्टेशन परिसरातील धोकादायक इमारतीचा काही भाग कोसळला

डोंबिवली पूर्वेतील स्टेशन परिसरात असलेल्या सुमती निवास या अति धोकादायक इमारतीचा काही भाग अचानक कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने ही इमारत रिकामी असल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, ही इमारत अत्यंत धोकादायक असल्याने इमारत पावसाळ्यापूर्वीच पाडकामाची कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी वारंवार केली होती. तरीही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

-नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात सर्वच लहान-मोठ्या नद्यांना मोठा पूर

नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात सर्वच लहान-मोठ्या नद्यांना मोठा पूर सकाळ पासून आला आहे.

पैठणहून संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे आज पंढरपूरकडे भक्तिमय वातावरणात प्रस्थान

- यंदा संत एकनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याचे 427 वे वर्ष

- 150 किलोच्या चांदीच्या रथातून संत एकनाथ महाराजांच्या पादुका टाळ - मृदंग आणि हरिनामाच्या गजरात होत आहेत प्रस्थान.

- राज्यभरातून हजारो वारकरी पैठणमध्ये दाखल; नाथनगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली

- सुमारे 285 किलोमीटरचा पालखी प्रवास; 24 जुलै रोजी पंढरपूरमध्ये आगमन

- मार्गात 18 मुक्काम आणि 5 पारंपरिक रिंगण सोहळ्यांचे आयोजन

- वारकऱ्यांसाठी पाणी, वैद्यकीय सेवा, सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेचे विशेष नियोजन

- भक्ती, समता आणि मानवतेचा संदेश देत संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ

दहिवली दरड दुर्घटना; बाप-लेकाचे मृतदेह अखेर सापडले

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील दहिवली येथील शेलारवाडीतील दरड दुर्घटनेत बेपत्ता असलेल्या दोघांचे मृतदेह अखेर एनडीआरएफच्या पथकाने शोधून काढले आहेत. दिवसभर चाललेल्या बचावकार्यानंतर शांताराम बाळा शेलार आणि त्यांचा मुलगा सतीश शांताराम शेलार यांचे मृतदेह दरडीखालून बाहेर काढण्यात आले. ही दुर्घटना काल रात्री मुसळधार पावसामुळे घडली होती. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून बचावकार्य आता पूर्ण झाले आहे.

दौंडला भिमा नदीला आलेल्या पुरामुळे वीटभट्टांना पुराच्या पाण्याचा तडाखा

दौंडच्या भीमा नदीच्य पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली आहे. साधारणत: १ लाख ६७ हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे नदीकाठच्या विटभटयांना पुराच्या पाण्याचा तडाखा बसला आहे. भिमा नदीला पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली असून त्यावर दौंड नगरपरिषद प्रशासन लक्ष ठेऊन आहे.

अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे सप्तशृंग गड बंद; भाविकांना पायथ्याशीच करावी लागली नवसपूर्ती

नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून सप्तशृंग गडाचा घाटरस्ता आणि देवी मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले. त्यामुळे मंगळवारी नवसपूर्तीसाठी आलेल्या शेकडो भाविकांची मोठी गैरसोय झाली. गडावर जाता न आल्याने भाविकांना पायथ्याशीच नवसपूर्ती करावी लागली. तसेच जेवणावळीही खालीच उरकाव्या लागल्या. प्रशासनाच्या सुरक्षेच्या निर्णयामुळे जीविताचा धोका टळला असला तरी भाविकांमध्ये निराशेचे वातावरण पाहायला मिळाले.

मुसळधार पावसाचा फटका; मुंबई-अहमदाबाद महामार्गाच्या सर्विस रोडवर दरड कोसळली

मुसळधार पावसामुळे मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या सर्विस रोडलगत दोन ते तीन ठिकाणी डोंगराचा काही भाग कोसळला. मोठे दगड, मातीचा ढिगारा आणि झाडे रस्त्यावर आल्याने सर्विस रोड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तसेच ११ हजार व्होल्टेजचा वीज खांबही कोसळण्याच्या स्थितीत असून परिसरात धोक्याचे वातावरण निर्माण झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी महामार्गालगतच्या डोंगरांमुळे पुढील धोका कायम आहे.

पुणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट; पुढील तीन तासांत मुसळधार पावसाचा इशारा

आज (७ जुलै २०२६) पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. सचेत अॅपवरील माहितीनुसार, पुढील तीन तासांत मुंबई उपनगर, नाशिक, पुणे घाट परिसर आणि रायगड जिल्ह्यातील काही भागांत ४० ते ५० किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी आणि अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या सर्विस रोडवर डोंगराचा काही भाग रस्त्यावर कोसळला

मुंबई  अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या सर्विस रोडवर डोंगराचा काही भाग रस्त्यावर कोसळला आहे

सर्विस रोड लगत असलेला दोन ते तीन ठिकाणी डोंगराचा भाग कोसळून खाली आला आहे

यात अनेक झाडे मोठमोठी दगड मातीच्या ढिगार्‍यासह सर्विस रोडवर आली आहेत. यामुळे सर्विस रोड वाहतुकीसाठी बंद केला आहे.

विद्युत पुरवठा करणारा 11 हजार व्होल्टेजचा खांब देखील कोसळण्याच्या स्थितीत झाला आहे

अमरावतीत मतदार याद्यांचे 'विशेष सखोल पुनरिक्षण' सुरू

अमरावतीत मतदार याद्यांचे 'विशेष सखोल पुनरिक्षण' सुरू;

25 लाख मतदारांच्या तपशिलाची घरोघरी जाऊन होणार पडताळणी

जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचे नागरिकांना सहकार्याचे आवाहन

नांदूर मधमेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग पुन्हा वाढवला

- नांदूर मधमेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग पुन्हा वाढवला

- दुपारी चार वाजल्यापासून धरणातून २१,९६५ क्यूसेक वेगाने पाणी सोडायला सुरुवात

- नाशिक शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नांदूर मधमेश्वर धरण्यात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक

देहू नगरीत जोरदार पाऊस

देहू नगरीत जोरदार पाऊस

काहीच क्षणांमध्ये संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान होणार

पालखी प्रस्थानाला वरुण राजाची उपस्थिती

वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिराच्या सुरक्षेचा केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाकडून आढावा

बीडच्या परळीतील वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिराच्या सुरक्षेचा केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाकडून आढावा.

सीसीटीव्ही कक्षासाठी स्वतंत्र रूम देण्याबरोबरच शस्त्रधारी गार्ड नियुक्तीची सूचना.

नाथांच्या पालखीवरून पुन्हा वाद; दुसरी पालखी रोखण्याची मागणी

आषाढी वारीसाठी श्री संत एकनाथ महाराजांच्या मानाच्या पालखीचे आज सूर्यास्तासमयी पंढरपूरकडे प्रस्थान होत असतानाच पालखीच्या अधिकाराचा जुना वाद पुन्हा ऐरणीवर आला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करून श्री संत एकनाथ महाराज यांच्या नावाने पारंपरिक पालखी मार्गावरून दुसरी पालखी अथवा दिंडी काढण्यास प्रतिबंध घालावा, अशी मागणी श्री संत एकनाथ महाराज संस्थान पालखी सोहळ्याचे प्रमुख रघुनाथबुवा नारायणबुवा पालखीवाले गोसावी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Nandurbar : आमदारांच्या बंद पडलेल्या कुक्कुटपालन केंद्रात आदिवासी विद्यार्थ्यांचे वस्तीगृह

आमदारांच्या बंद पडलेल्या कुक्कुटपालन केंद्रात आदिवासी विद्यार्थ्यांचे वस्तीगृह....

नवापूरच्या आदिवासी वसतिगृहाची दुरवस्था 500 विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न

नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यातून पाण्याचा विसर्ग वाढवला

- नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यातून पाण्याचा विसर्ग वाढवला

- दुपारी १ वाजल्यापासून नंदुरमाध्यमेश्वर बंधाऱ्यातून ७९२४ क्यूसेक वेगाने गोदावरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग

वेळ नदीत फेस; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

वेळ नदीवर अवलंबून असलेल्या नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा, जनावरांच्या पाण्याचा तसेच शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.नदीपात्रात रासायनिक (केमिकलयुक्त) सांडपाणी सोडले जात असल्याची शंका नागरिकांकडून व्यक्त केली जात असून, यामुळे पर्यावरणासह सार्वजनिक आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. संबंधित प्रशासनाने तातडीने पाण्याचे नमुने तपासून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

नाशिकमध्ये काँग्रेसचे सत्याग्रह आंदोलन 

नाशिकमध्ये काँग्रेसचे सत्याग्रह आंदोलन...

काळाराम मंदिरासमोर सत्याग्रह आंदोलन...

अयोध्या येथील राममंदिरातील चोरी प्रकरणाविरोधात आंदोलन...

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार शोभा बच्चाव, माजी आमदार मोहन जोशी यांच्यासह स्थानिक पदाधिकारी आणि काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित...

चौकीदार चोर है.. काँग्रेसकडून घोषणाबाजी...

भर पावसात काँग्रेसचे सत्याग्रह आंदोलन...

कुडाळमध्ये तीन घरांवर झाड कोसळून लाखोंची हानी

वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे कुडाळ तालुक्यातील चेंदवण गावामध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. येथील मेस्त्री कुटुंबाच्या घरावर अचानक औदुंबराचे मोठे झाड आणि भेडला माड उन्मळून पडला. या झाडाच्या अजस्त्र फांद्या मेस्त्री कुटुंबाच्या तीन घरांवर पडल्यामुळे घरांचे मोठे नुकसान झाले आहे. वादळ एवढे भयानक होते की, झाड पडताच मोठा आवाज झाला. सुदैवाने, या एवढ्या मोठ्या संकटामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र, ऐन पावसाळ्यात हक्काचे छप्पर उडाल्यामुळे मेस्त्री कुटुंब आता उघड्यावर आले. प्रशासनाने तातडीने पंचनामा पूर्ण केला आहे.

पालघर जिल्हाधिकारी इंदूराणी जाखड यांची पत्रकार परिषद

जिल्ह्यात मुसळधार झालेल्या पावसा संदर्भात जाखड यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती. पालघर जिल्ह्यात आज देखील पावसाचा रेड अलर्ट . पिंजाळ नदीने इशारा पातळी ओलांडली .पिंजाळ नदी परिसरात राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा . जिल्ह्यात काल पालघर मधील एक हजार नागरिकांना तर डहाणूतील 200 अशा एकूण बाराशे नागरिकांचे स्थलांतरण करण्यात आलं . स्थलांतरित केलेल्या नागरिकांसाठी राहण्याची आणि खाद्यपदार्थांची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे .

इंदापूर कर्मयोगी साखर कारखान्यावर कामगारांचे धरणे आंदोलन....

पुण्याच्या इंदापूर मध्ये कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना सहयोग ओंकार शुगर युनिट नंबर 11 वरती कामगारांनी थकीत वेतन मिळावं या मागणीसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन केलं आहे.

पुराच्या पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्याचे प्रश्न गंभीर 

पिंपरी चिंचवड शहरातील काही भागात पुराचे पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे. मात्र अजूनही स्पाईन रोडवरील घरकुल सोसायटी मोठ्या प्रमाणात पावसाच आणि ड्रेनेजच पाणी तुंबला आहे.

आंबेनळी घाट बंदीवर स्थानिकांच्या संतप्त प्रतिक्रिया

पोलादपुर आणि महाबळेश्वर जोडणारा आंबेनळी घाट पुढील महिना भर वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयाला स्थानिकांनी विरोध केला असून जेंव्हा रेड अलर्ट असेल पाऊस अधिक असेल तेंव्हाच घाट बंद ठेवा. इतर वेळी घाटातील रहदारी सुरु ठेवा अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील वाहतूक पूर्णपणे सुरळीत; दोन्ही मार्ग खुले

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील मुंबई-पुणे आणि पुणे-मुंबई या दोन्ही दिशेची वाहतूक कनेक्टिंग लिंकमार्गे सुरळीत सुरू करण्यात आली आहे. मुंबईकडील मार्गही रात्री उशिरा खुला करण्यात आला. जुना मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 देखील वाहतुकीसाठी खुला आहे. तसेच, रायगड जिल्ह्यातील मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूकही पूर्ववत सुरू झाल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाने दिली.

पुणे जिल्ह्यातील वेल्हे येथील बार्शीमाळ या डोंगराळ भागात दरड कोसळली

या परिसरात मुसळधार पावसामुळे दरडी कोसळण्याची घटना

बार्शीमाळ–पासली मार्ग काही काळासाठी बंद

बार्शीमाळ येथे दरड कोसळल्याने वाहतूक बंद झाली असून पासली येथील शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा मार्गही बंद झाला

वाई तालुक्यात जांभळीत २४ तासांत ५५० मिमी रेकॉर्डब्रेक पाऊस

सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील जांभळी गाव आणि परिसराला मुसळधार पावसाने झोडपून काढले असून, गेल्या २४ तासांत येथे तब्बल ५५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मुख्य पूल पाण्याखाली गेल्याने जांभळी गाव आणि स्थानिक आदिवासी पाड्याचा संपर्क पूर्णपणे तुटला असून येथील जनजीवन पूर्णपणे ठप्प झाले आहे.

नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर खोडाळा रस्ता बंद

- मातीचा भराव टाकलेला पूल वाहून गेल्याने ४० हून अधिक गावांचा संपर्क तुटला

- नवीन रस्त्याचे काम सुरू असताना नव्याने बांधण्यात येणाऱ्या पुलाच्या बाजूला मातीचा भराव टाकून तयार केलेला पूल गेला वाहून

- मातीचा भराव टाकलेला पूल वाहून गेल्याने ४० हून अधिक गावांचा संपर्क तुटला

देहू नगरीमध्ये न येता पिंपरी चिंचवड किंवा पुण्यातून पालखीमध्ये सहभागी व्हा, भाविकांना आवाहन

संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याला निवडक जणांनाच प्रवेश दिला जाणार

प्रमुख दिंडी प्रमुख तसेच विणेकरी आणि झेंडेकरी यासह मोजक्या भाविकांना आज आत मध्ये प्रवेश दिला जाणार

देहू मध्ये गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे इंद्रायणी नदीला पूर

संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळा प्रमुख यांची माहिती

नाशिक- मुसळधार पावसामुळे पहिने भिलमाळ रस्त्यावर तात्पुरत्या स्वरूपात तयार केलेला पूल वाहून गेला

नाशिक मध्ये गोदावरीच्या पाणी पातळीत मोठी वाढ

दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्याच्या खालीपर्यंत गोदावरीच्या पुराचे पाणी पोहोचलं

आज पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट

पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट

पुढील 3 तासांत काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि ताशी 40-50 किमी वेगाने सोसाट्याचे वारे वाहण्याची दाट शक्यता

नाशिकच्या इगतपुरीत सर्वाधिक 200 मिमी पावसाची नोंद

- त्र्यंबकेश्वरमध्ये 125 मिमी पाऊस

- सुरगाणा येथे 149 मिमी पावसाची नोंद

- सिन्नरमध्ये 74 मिमी, पेठमध्ये 61 मिमी पाऊस

- दिंडोरीमध्ये 58 मिमी, पिंपळगावमध्ये 51 मिमी पाऊस

- देवळा येथे 40 मिमी पावसाची नोंद

- सततच्या पावसामुळे जिल्हाभरातील परिस्थितीवर प्रशासनाचे लक्ष

देहूत वारकऱ्यांना इंद्रायणी मध्ये स्नान करण्यासाठी मज्जाव

जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा 341 वा पालखी सोहळा आज देहू नगरीमध्ये साजरा होत आहे. दरवर्षी लाखोंच्या संख्येने वारकरी येऊन या ठिकाणी पवित्र अशा इंद्रायणी नदीमध्ये स्नान करतात. मात्र यावर्षी इंद्रायणीने रौद्ररूप धारण केलेला आहे. मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदी ती दुथडी भरून वाहत आहे. तसेच इंद्रायणी नदीने धोक्याची पातळी देखील ओलांडलेली आहे.

नाशिकमध्ये पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात

गोदावरीच्या पाणी पातळीत हळूहळू होतेय वाढ

खबरदारीचा उपाय म्हणून नदी किनाऱ्यावरील छोटी दुकान आणि टपऱ्या हटवल्या

पुणे जिल्ह्यात दोन दिवसांपासून जोरदार पाऊस

पुणे जिल्ह्यातील सर्व 22 धरण क्षेत्रामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग

जिल्ह्यातील सर्व धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ

तर पश्चिम महाराष्ट्रातल्या काही नद्यांना आज देखील धोक्याचा इशारा

Nagpur: दीक्षाभूमीच्या सौंदरीकरण व सर्वांगीण विकासाबाबत आज महत्वाची बैठक

नागपूर -

- दीक्षाभूमीच्या सौंदरीकरण व सर्वांगीण विकासाबाबत नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण येथे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली.

- दीक्षाभूमीचा सर्वसमावेशक विकास आराखडा लवकरच सर्वसहमतीने साकारला जाणार आहे

- महानगराचा विस्तार, नवीन नागपूर आणि वाढते पर्यटन लक्षात घेऊन विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे

- या माध्यमातून देश-विदेशातून येणाऱ्या लाखो अनुयायांना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न.

- पंचशील आणि धम्माची मूल्ये दीक्षाभूमी परिसरात अधिक प्रभावीपणे प्रतिबिंबित करण्यावर भर.

- लोकप्रतिनिधी, बौद्ध समाज, अभ्यासक आणि समाजातील चिंतक यांच्या सहभागातून विकास आराखडा अंतिम करण्यात येणार.

- दीक्षाभूमीचा विकास आराखडा लवकरच सर्वसहमतीतून साकारण्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

Ratnagiri: रत्नागिरीच्या दहिवलीतील भुस्खलन झालेल्या ठिकाणी उदय सामंत यांनी केली पाहणी

रत्नागिरीच्या दहिवलीतील भुस्खलन झालेल्या ठिकाणी उदय सामंत यांनी केली पाहणी

अँकर - खेड तालुक्यातील दहिवली येथे भुस्खलन झालेल्या ठिकाणी पालकमंत्री उदय सामंत सकाळी 6 वाजताच घटनास्थळी दाखल झाले.

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील दहिवली येथील शेलारवाडीमध्ये सोमवारी रात्री भूस्खलनाची घटना घडली

घटनेची माहिती समजल्यानंतर उदय सामंत यांनी तातडीने आज सकाळी 6 वाजण्याचा सुमारास घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

तसेच या ठिकाणी आणि आजूबाजूच्या परिसरातील कुटुंबांना स्थलांतरित करण्याचे आदेश सुद्धा पालकमंत्री उदयजी सामंत यांनी दिले.

Kolhapur:  वारणा नदीवरील बच्चे-सावर्डे ते मांगले बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूंचा भराव खचला

कोल्हापूर -

पन्हाळा आणि शिराळा तालुक्यातील गावांना जोडणाऱ्या वारणा नदीवरील बच्चे-सावर्डे ते मांगले बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूंचा भराव खचला

बंधारा पाण्याखाली गेल्यानंतर बंधाऱ्याच्या बाजूचा भराव खचला

Pune: भोर -महाड मार्गावरील वरंधा घाटातील दरडी हटविण्याचे काम युद्ध पातळीवर

- भोर -महाड मार्गावरील दरडी हटविण्याचे काम युद्ध पातळीवर

- हिर्डोशी ते शिरगाव हद्दीतील सकाळपासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत जवळपास १५ छोठ्या मोठ्या दरडी हटवण्यात आल्या आहेत.

- उंबर्डे हद्दीतील दोन तीन दरडी हटवणे बाकी आहे.

- दोन पोकलेन, दोन जेसीबी, एक हायड्रा व दोन लोडर या मशिनच्या सहाय्याने काम सुरु आहे

- घाटात अडकलेल्या वाहनातील प्रवाशांना नाष्टा व पाणी भोर पोलिसांनकडून देण्यात येत आहे.

Pune: पुण्यातील ताम्हिणीजवळ दरड कोसळली

पुणे - ताम्हिणीजवळ दरड कोसळली

तीन घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली

सुदैवाने जीवितहानी टळली

मुळशी तालुक्यातील पौड पोलीस स्टेशन हद्दीतील घटना

Sangli: सांगलीत वारणा नदीच्या पाणीपातळीत वाढ

सांगली - वारणा नदीच्या पाणीपातळीत वाढ

सांगली कोल्हापूर जिल्ह्याला जोडणाऱ्या महत्त्वाच्या ऐतवडे खुर्द पुलाला टेकले पाणी

पुलावरून वाहतूक करताना काळजी घेण्याचे 'कुरळप पोलिसांचे' आवाहन!

Navi Mumbai: वाशी टोलनाक्यावर बेस्ट बसचा भीषण अपघात, ४ प्रवासी जखमी

वाशी टोलनाक्यावर बेस्ट बसचा भीषण अपघात

चालकाला चालत्या गाडीत फिट आल्याने दुर्घटना

४ प्रवासी किरकोळ जखमी

Ratnagiri: आंबोलीचं सौदर्य दाट धुके आणि रिमझिम पावसामुळे बहरलं

रत्नागिरी -

महाराष्ट्राची चेरापूंजी म्हणून ओळख असलेल्या आंबोली घाटात धुक्याची चादर पसरली आहे. आंबोलीचं सौदर्य दाट धुके आणि रिमझिम पावसामुळे बहरलं आहे.

संपूर्ण घाट परीसर व आंबोली शहरात दाट धुके पसरले असून आल्हाददायक वातावरण निर्माण झाले आहे.

या मार्गावरून प्रवास करणाऱ्या पर्यटक व वाहनचालकांना हा अधबूत नजारा अनुभवायला मिळत आहे.

रस्त्यावर दाट धुके पसरल्यामुळे गाडी चालवताना वाहन चालकांना मात्र कसरत करावी लागत आहे.

Pune: पुणे जिल्ह्यातील पाबे घाट रस्ता बंद

पुणे -

पुणे जिल्ह्यातील पाबे घाट रस्ता बंद

पाबे घाटातून खामगाव मार्गे येणारा ओढ्याला आला पूर

पुणे खानापूर रांजणे पाबे मार्गे वेल्हे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील थोपटेवाडी येथील पुलावरुन पाणी

ओढ्यावरून पाणी गेल्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली आहे

१० ते १२ गावे आणि वाड्या वस्त्या यांचा संपर्क तुटला

पानशेतकडे जाणारा पर्यायी मार्ग देखील बंद

Nashik: काल रात्रीपासून धरण क्षेत्रात संततधार पाऊस, धरणांतील पाणीसाठ्यात वाढ

नाशिक -

- काल रात्रीपासून धरण क्षेत्रात संततधार पाऊस, धरणांतील पाणीसाठ्यात वाढ

- नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण 37% भरले

- दारणा धरणातील पाणीसाठा 21% वर

- भावली धरण 56% क्षमतेपर्यंत भरले

- जिल्ह्यातील धरणांमधील एकूण पाणीसाठा 28% वर पोहोचला

- सततच्या पावसामुळे धरण क्षेत्रातील परिस्थितीवर प्रशासनाचे बारकाईने लक्ष

Parbhani: मुंबई पुण्यात मुसळधार पावसाचा कहर मराठवाड्यात मात्र पावसाची प्रतीक्षा कायम

परभणी -

मुंबई पुण्यात मुसळधार पावसाचा कहर मराठवाड्यात मात्र पावसाची प्रतीक्षा कायम

परभणी जिल्ह्यात दमदार पावसाचा अभाव; आहे त्या ओलाव्यावरच शेतकऱ्यांची पेरणी सुरू

पाऊस नसल्याने पेरण्या रखडल्या; नाईलाजाने देवाच्या भरवशावर जी काही जमिनीत ओल आहे त्याच्या भरोशावर पेरणीला सुरुवात

जुलैचा पहिला आठवडा संपत आला तरी परभणीत समाधानकारक पाऊस नाही

Nashik: रामकुंड परिसरामध्ये गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ

नाशिक -

- रामकुंड परिसरामध्ये गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ

- परिसरात पोलिसांची कुमक तैनात

- गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर येणारे रस्ते बॅरिकेड्स लावून करण्यात येतायत बंद

Raigad: मुंबई -गोवा महामार्गावरील वाहतूक पहाटेपासून सुरू

रायगड -

- मुंबई -गोवा महामार्गावरील वाहतूक पहाटेपासून सुरू

- सुकेळी आणि वाकण येथील पुलावरील पुराचे पाणी ओसरले

- पाली जवळ रस्त्यावर पुराचे पाणी असल्याने वाकण ते खोपोली मार्ग अद्यापही बंदच

- जिल्हा प्रशासनाची माहिती

- रोहा, नागोठणे येथील पाणी नद्यांची पाणी पातळी कमी झाली

Raigad: आंबेनळी घाट बंद असताना देखील वाहन चालक करत आहेत घाट रस्ता

रायगड -

- आंबेनळी घाट बंद असताना देखील वाहन चालक करत आहेत घाट रस्ताचा वापर

- घाट रस्त्यात कोसळलेल्या दरडीच्या मातीतून धोकादायक पद्धतीने वाहन काढण्याचे केले जात आहेत प्रयत्न

Navi Mumbai: नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळांना तसेच महाविद्यालयांना आज सुट्टी

नवी मुंबई -

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळांना तसेच महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आलीय

सदर आदेशाची सर्व संबंधित शाळांनी तात्काळ अंमलबजावणी करावी.

विद्यार्थी, पालक व शिक्षकांना याबाबतची माहिती त्वरित कळविण्यात यावी.

असे आदेश ठाणे जिल्हाधिकारी डॉ कृष्णा पांचाळ यांनी पारित केलेत

Raigad:  महाड बाजार पेठेत पुर परिस्थिती कायम

रायगड -

- महाड बाजार पेठेत पुर परिस्थिती कायम

- गेल्या 36 तासांपासून साचले आहे महाड बाजार पेठेत पुराच पाणी

- सावित्री नदी धोका पातळी वरून वाहत आहे

- पाणी कमी होण्यास सुरुवात झाल्याने दुकानदारांनी केली साफसफाईला सुरुवात

- रायगडला पावसाचा रेड अलर्ट

- शाळा महाविद्यालयांना सुट्टी

Navi Mumbai: नवी मुंबईत दिवसभरात ७० झाडे पडली

नवी मुंबई -

नवी मुंबईत दिवसभरात ७० झाडे पडली

तर आठवड्याभरात 175 झाडे उन्मळून पडलीत

अनेक ठिकाणी सोसायटीमध्ये आणि गाड्यांवर झाडं पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे

Ulhasnagar: उल्हासनगरमधील सर्व शाळांना मंगळवारी सुट्टी

उल्हासनगरमधील सर्व शाळांना मंगळवारी सुट्टी

अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे महापालिकेचा निर्णय

प्रादेशिक हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिल्याने हा निर्णय घेण्यात आला

शिक्षण विभागाने याबाबत सर्व मुख्याध्यापकांना आदेश जारी केले असून सुट्टीची माहिती तात्काळ पालकांपर्यंत पोहोचविण्याच्या सूचना दिल्या आहेत

तसेच सकाळच्या सत्रातील विद्यार्थी शाळेत आल्यास त्यांना सुरक्षितपणे घरी पाठविण्याचे निर्देश शिक्षण अधिकारी किशोर गोसावी यांनी दिले आहेत.

Pune: पुणे शहरासह पिंपरी चिंचवडमधील सर्व शाळा आज बंद

पुणे -

पुणे शहरासह पिंपरी चिंचवडमधील सर्व शाळा आज बंद

सर्व प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना सुट्टी

पुणे शहराला ऑरेंज तर जिल्ह्यातील घाट माथ्यावर रेड अलर्ट जारी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अक्कलपाडा धरणातून पाण्याचा विसर्ग, पांझरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Veen Doghatli Hi Tutena: संवाद नाही, तरीही भावना पोहोचणार! 'वीण दोघातली ही तुटेना'मध्ये रंगणार नो-डायलॉग एपिसोड

Bank Closed: पुढील महिन्यात बँक १४ दिवस राहतील बंद; RBI कडून सुट्ट्यांची यादी जाहीर

MPSC पेपरफुटी प्रकरणात नवा ट्विस्ट; तक्रारच बनावट असल्याचा दावा

उकडलेली चवळी खाण्याचे फायदे काय आहेत?

SCROLL FOR NEXT