2 youths drown in vasai saam tv
महाराष्ट्र

Mumbai News: समुद्र किनाऱ्यावर फिरायला जाणं जीवावर बेतलं, 2 तरुणांचा बुडून मृत्यू; वसईतील दुर्दैवी घटना

Mumbai News: समुद्र किनाऱ्यावर फिरायला जाणं दोन तरुणांच्या जीवावर बेतलं आहे. वसईच्या समुद्रात बुडून दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे.

Chandrakant Jagtap

>>चेतन इंगळे, वसई

Mumbai News: वसईतील कळंब समुद्र किनाऱ्यावर फिरायला आलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सौरभ पाल आणि रोशन गावडे अशी दोन्ही तरुणांची नावे आहेत. यापैकी रोशन गावडे याचा मृतदेह नालासोपारामधील भुईगाव समुद्र किनाऱ्यावर वाहून आला आहे. वसई-विरारमधील अग्निशमन दलाचे जवान सौरभ पाल याचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार सौरभ आणि रोशन आपल्या इतर दोन मित्रांसोबत वसईतील कळंब समुद्र किनाऱ्यावर फिरायला आले होते. याठिकाणी ते चौघे समुद्रात उतरले. परंतु समुद्राच्या खोल पाण्याचा अंदाज न आल्याने सौरभ आणि रोशन बुडाले. या दोघांची मित्रांसोबतची ही पिकनिक शेवटची ठरली.(Latest Marathi news)

पुण्यातही तरुणाचा बुडून मृत्यू

दरम्यान पुण्यात देखील अशीच एक घटना समोर आली आहे. रिल्स तयार करताना एका तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना करंजविहिरे परिसरातील भामा आसखेड धरण परिसरात घडली आली आहे. दत्ता भारती असे मृत्यू झालेल्या २४ वर्षीय तरुणाचे नाव असून तो बीड जिल्ह्यातील वराळे येथील राहिवाशी आहे. (Pune news)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress : 'बिग बॉस' शोचे आमिष दाखवून प्रसिद्ध अभिनेत्रीला ११ लाखांचा गंडा, मुंबईत तिघांविरुद्ध गुन्हा

Maharashtra News Live Update: बनावट शालार्थ आयडी प्रकरणात १,१०० पानांचे दुसरे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल

Lionel Messi: इंग्लंड जिंकणार वाटत असतानाच मेस्सीने फिरवली जादूची कांडी; अवघ्या 7 मिनिटांत मिळवलं फायनलचं तिकीट, वाचा नेमकं काय घडलं?

Beed : विलास घुले हत्या प्रकरणात मोठी अपडेट, उमेश मानेवर बलात्काराचा गुन्हा; विवाहित महिलेशी जबरदस्ती संबंध ठेवले अन्...

Wardha Crime: महाराष्ट्र हादरला! १२ वर्षीय मुलीवर अत्याचार करून हत्या, शेतातील घरामध्ये विवस्त्र अवस्थेत आढळला मृतदेह

SCROLL FOR NEXT