Mumbai car  saam tv
महाराष्ट्र

Mumbai : मुंबईत चालत्या कारने अचानक घेतला पेट; नशीब बलवत्तर म्हणून प्रवासी वाचले

चालत्या कारला अचानक आग (Fire) लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

साम टिव्ही ब्युरो

संजय गडदे

Mumbai news : मुंबईच्या अंधेरी पश्चिमेकडील सातबंगला जेपी रोडवर अचानक चालत्या होंडा सिटी कारने अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे. या घटनेत कार (Car) जळून खाक झाली आहे. सदर घटना शनिवारी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. चालत्या कारला अचानक आग (Fire) लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. (Mumbai Car Fire)

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या सात बंगला परिसरातून वर्सोवा कोळीवाड्याच्या दिशेने चाललेली होंडा सिटी कारने जे प्रकाश रोडवरील 'दर्या महल' या बंगल्यासमोर अचानक पेट घेतला. होंडा सिटी कारने अचानक पेट घेतल्याने कारमधील तीनही प्रवाशांनी प्रसंगावधान दाखवत कारमधून खाली उतरले. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या घटनेत होंडा सिटी कार पूर्णपणे खाक झाली असल्याचे समजते.

दरम्यान, चालते वाहन पेटण्याच्या घटना मोठ्या प्रमाण वाढल्या आहेत. काही दिवसांपूर्वी कल्याणच्या नेतिवली परिसरात नवी मुंबई महापालिकेच्या बसने पेट घेतला. बसला आग (Fire) लागली त्यानंतर चालक-कंडक्टर यांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही. घटनेवेळी सदर बसमध्ये ५० प्रवासी होते. त्यामुळे अचानक वाहनांना आग लागण्याच्या घटना वाढल्याने प्रवाशांची चिंता वाढली आहे .

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Haircare Tips: कमी वयात केस पांढरे झालेत? करा 'या' टिप्स फॉलो

Sanjay Raut: मुंब्रात काय पाकिस्तानात शिवरायांचं मंदिर उभारू, संजय राऊतांचं फडणवीसांना उत्तर!

Nachos Chaat At Home Recipe: घरच्याघरी बनवा हेल्दी नाचोस चाट; नोट करा सिंपल रेसिपी

Vargamantri: निवडणुकीच्या धामधूमीत आता "वर्गमंत्री" कोण होणार? ट्रेलर आला समोर

Parineeti Chopra: नवीन चित्रपटासाठी परिणीतीचा नवा लूक, केसांना कलर देत चाहत्यांना दिली बातमी

SCROLL FOR NEXT