The newly inaugurated 800-meter long, four-lane bridge over Kasheli Creek, aimed at reducing bottlenecks on the Mumbai-Nashik Highway. saam tv
महाराष्ट्र

मुंबई-नाशिक प्रवास होणार सुसाट! ठाणे, भिवंडी, कल्याणमधील प्रवाशांना वाहतूक कोंडीतून दिलासा

New Kasheli Creek bridge Opening Date And Impact On Traffic: मुंबई-नाशिक महामार्गावरील काशेळी खाडीचा नवीन ४ पदरी पूल वाहतुकीसाठी खुला झाला आहे. मे महिन्यापर्यंत माजिवडा-वडपे रस्ते रुंदीकरणाचे काम पूर्ण होणार असून, यामुळे ठाणे, भिवंडी आणि कल्याणमधील प्रवाशांचा प्रवास सुसाट होईल.

Omkar Sonawane

ठाणे: काशेळी खाडीवरील 800 मीटर लांबीचा चार पदरी पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. यामुळे नवीन मुंबई-नाशिक महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना अंशतः दिलासा मिळाला आहे. मात्र खारेगाव आणि पिंपळास यांसारख्या अनेक महत्वाच्या ठिकाणांवरील रुंदीकरणाचे काम अजून पूर्ण होणे बाकी आहे. माजीवाडा ते आमणे या संपूर्ण महामार्गाचे रुंदीकरण पूर्ण झाल्यानंतरच वाहनधारकांना पूर्णतः दिलासा मिळेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

विशेष म्हणजे हा महामार्ग मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला जोडला जाणार असून मराठवाडाला देखील लवकर पोहोचू शकणार आहेत. जुन्या खाडी पुलावरील मार्गिका अरुंद असल्याने एकाच पुलावरून दोन्ही दिशेकडील वाहतूक होत असल्याने वाहतूक कोंडी मनःस्ताप चालकांना सहन करावा लागत होता. नवा खाडी पुल सुरू झाल्याने मुंबई, ठाणे, मुंब्रा, कळवा, भिवंडी, कल्याण, नाशिक शहरातील तसेच समृद्धी महामार्गाने मुंबई, ठाणे शहराच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळणार आहे.

दरम्यान मुख्य रस्त्याचे काम 90 टक्के पूर्ण झाले असून मे महिन्याच्या अखेरपर्यंत माजिवाडा-वडपे मार्गावरील सर्व कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट राज्य रस्ते विकास महामंडळाचे (MSRDC) आहे. माजिवाडा- वडपे या प्रकल्पाची मुख्य मार्गिका 23.80 किमी लांबीचा असून 21.31 किमी लांबीची कामे पूर्ण झाली आहेत. त्यानुसार हा प्रकल्प 90 टक्के पूर्ण झाला आहे. तर सेवा रस्ते 18.35 किमी लांबीचे असून त्यापैकी 16.88 किमी लांबीचे कामे पूर्ण झाली. हा प्रकल्प मे महिन्याच्या शेवटी म्हणजेच पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट MSRDC चे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Neeru Dhanda Asian Games 2026: नीरू ढांडाचा ट्रॅप शूटिंगमध्ये 'सुवर्ण'वेध, भारताला पाचवं गोल्ड मेडल

Maharashtra News Live Update: देशातून फरार असलेला निलेश घायवळ खंडणी प्रकरणात निर्दोष मुक्त

Maharashtra Drought: शेतकऱ्यांना दिलासा! दुष्काळात वगळलेल्या तालुक्यांचा यादीत समावेश, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

Tea Water for Hair: केसगळती कमी करुन केस होतील शायनी आणि घनदाट; केसांना लावा चहा पत्तीचं पाणी

World Heart Day: सतत गुडघेदुखीचा त्रास होतोय? हृदयासाठीही ठरू शकतो इशारा, जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

SCROLL FOR NEXT