Igatpuri Amane Route Samruddhi Expressway  Indian express
महाराष्ट्र

Samruddhi Expressway : समृद्धीवरून रेकॉर्डब्रेक वाहनांचा प्रवास, ७२ कोटी रूपयांचा टोल मिळाला

Samruddhi Expressway : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. महिनाभरात हा महामार्ग पूर्णपणे सुरू होणार आहे.

Namdeo Kumbhar

Mumbai-Nagpur Samruddhi Expressway : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. २०१९ मध्ये महामार्गाच्या कामाला सुरूवात झाली होती, आता हा महामार्गाचे १०० टक्के काम पूर्ण झाले आहे. महिनाभरात हा महामार्ग सर्वांसाठी खुला होणार आहे. समृद्धी महामार्ग सुरू झाल्यानंतर मुंबई ते नागपूर हे अंतर फक्त ८ तासांत पूर्ण होणार आहे. प्रत्येक महिन्याला समृद्धी महामार्गावरून प्रवास कऱणाऱ्यांची संख्या वाढत आहे. फेब्रुवारीमध्ये या महामार्गावरून तब्बल १० लाख वाहनांनी प्रवास केला, यामधून सरकारला ७२ कोटी रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्ग पाडव्याच्या आधी सर्वांसाठी खुला (Mumbai-Nagpur Samruddhi Expressway is now fully complete) होणार आहे. 701 किमी लांबीचा हा महामार्ग महाराष्ट्राच्या सामाजिक व आर्थिक विकासासाठी महत्त्वपूर्ण आणि गेमचेंजर ठरणारा आहे. समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्धघटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांने केले होते. त्यानंतर हा महामार्ग टप्प्या टप्प्याने सुरू करण्यात आला. अखेरच्या टप्प्याचे काम १०० टक्के पूर्ण झालेय, एका महिन्यात हा महामार्ग १०० सुरू होणार आहे. गुढी पाडव्याला समृद्धी महामार्ग १०० टक्के प्रवासासाठी खुला होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या नागपूर ते इगतपुरी यादरम्यान हा एक्सप्रेस वे सुरू आहे. अखेरचे ७६ किमीचे काम जवळपास पूर्ण झाले आहे.

फेब्रुवारीमध्ये १० लाख वाहनांचा प्रवास -

नागपूर-मुंबई समुद्धी महामार्गावरून फेब्रुवारी महिन्यात तब्बल १० लाख वाहनांनी प्रवास केला. आतापर्यंतची ही सर्वाधिक वाहन संख्या आहे. कुंभमेळ्याला गेलेल्या भाविकांनी समृद्धी महामार्गाचा वापर केल्यामुळे वाहनांच्या संख्येत वाढ झाली. फेब्रुवारी महिन्यात टोलच्या माध्यामातून सुमारे ७२ कोटी रूपयांचे उत्पन्न राज्य रस्ते विकास महामंडळाले झाले आहे.

समृद्धी महामार्गावर वाहनांची संख्या वाढली -

प्रत्येक महिन्याला समृद्धी महामार्गावरून सरासरी ३० ते ४० हजार वाहने प्रवास करताता, पण फेब्रुवारी महिन्यात ही संख्या तब्बल १० लाखांवर पोहचली आहे. समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा महिनाभरात सुरू होणार असल्याची माहिती मिळाली आहे. नागपूर-मुंबई समुद्धी महामार्गामुळे प्रवास वेगवान आणि आरामदायी झाला आहे. प्रत्येक महिन्याला प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत फेब्रुवारीमध्ये सर्वाधिक वाहनांनी प्रवास केला आहे. कुंभमेळ्यामुळे वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भाजपच्या आमदाराने शिवसेना आमदाराच्या घरी 100 पोलीस मध्यरात्री घरात पाठवले पहा

BMC Election : बीएमसीत मनसे ठरणार किंगमेकर? महायुतीला रोखण्यासाठी काँग्रेस भूमिका बदलणार?

अयोध्येतील राममंदिरावर भगवा ध्वज, काय आहे वैशिष्ट्यं ?

Local Body Election : महाराष्ट्रात घराणेशाहीचा सिक्सर,शिंदेसेनेत एकाच घरात 6 उमेदवार

'जोपर्यंत CM तोपर्यंत लाडकी बहीण योजना'; मुख्यमंत्री फडणवीसांनी योजनेबाबत दिला शब्द

SCROLL FOR NEXT