मलकापूरजवळ मुंबई–नागपूर महामार्गावर भीषण कार अपघात
कार झाडाला धडकल्याने तीन तरुणांचा मृत्यू
दोघे गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू
घटनेनंतर मलकापूर परिसरात शोककळा
बुलढाण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई नागपूर हायवेवर मालकापूर नजीक कारवरील नियंत्रण सुटल्याने भिषण अपघात झाला आहे. या अपघातात कार मधील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने मलकापूर शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या अपघातात रुद्र उमेश पवार (वर्षे १९), विनायक जनार्दन अत्तरकर (वय १९) , गणेश दीपक इंगळे (वर्षे १८) यांचा मृत्यू झाला आहे. तर प्रशांत राजू वणारे (वर्षे २१), आणि तक्ष धुरंदर (वर्षे १९) हे गंभीर जखमी झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इरटीगा कंपनीची चारचाकी कार राष्ट्रीय महामार्गावरून धुपेश्वरकडून मलकापूरकडे येत असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. गाडीवरचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यालगत असलेल्या झाडाला जोरदार धडकली. धडक इतकी भीषण होती की वाहनाचा चक्काचूर झाला. तर रुद्र उमेश पवार, विनायक जनार्दन अत्तरकर यांचा जागीच मृत्यू झाला.
गणेश दीपक इंगळे, प्रशांत राजू वणारे, आणि तक्ष धुरंदर हे तिघे गंभीर जखमी झाले. दरम्यान, गंभीर जखमी असलेल्या गणेश दीपक इंगळे यांना पुढील उपचारासाठी अकोला येथील रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
त्यामुळे या अपघातातील मृतांचा आकडा तिघांवर पोहोचला आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य करत जखमींना रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. या भीषण अपघातामुळे मलकापूर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.