Mumbai Maratha Protest  x
महाराष्ट्र

Mumbai Maratha Protest : मराठा आंदोलनाच्या याचिकेवर हायकोर्टचा काय निर्णय? | VIDEO

Manoj Jarange Maratha Protest : मनोज जरांगे यांच्या नेतृत्त्वात मराठा आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाच्या विरुद्धच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान हायकोर्टाने काय म्हटले?

Yash Shirke

  • मराठा आंदोलनावर दाखल याचिकेवर सुनावणी घेत मुंबई हायकोर्टाने आंदोलकांना दोन दिवसांत सर्व काही पूर्ववत करण्याचे निर्देश दिले.

  • आझाद मैदानाव्यतिरिक्त आंदोलकांनी मुंबईत कुठेही वावरू नये, पाच हजारांपेक्षा जास्त लोक जमू नयेत, अशी अट कोर्टाने घातली.

  • सामान्य मुंबईकरांना त्रास होऊ नये म्हणून राज्य सरकार आणि आयोजकांनी जबाबदारीने पावले उचलावीत, असे हायकोर्टाने स्पष्ट केले.

Manoj Jarange Mumbai Maratha Protest : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मनोज जरांगे पाटील यांनी चलो मुंबई मोर्चाचे आयोजन केली. मागील ४ दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे मराठा आंदोलकांसह मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करत आहेत. या आंदोलनाच्या विरोधात मुंबई हायकोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेची आज (१ सप्टेंबर) सुनावणी झाली.

मराठा आंदोलनामुळे मुंबईमधील सर्वसामान्यांचे हाल होत असल्याे याचिकेमध्ये म्हटले आहे. सुनावणीदरम्यान आंदोलनाचा मुंबईवर परिणाम होत असल्याचे मुंबई हायकोर्टाने म्हटले. जर नियमांचे उल्लंघन होत आहे, तर याबाबत राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांना का सांगितले नाही, असा सवाल हायकोर्टाने प्रशासनाला विचारला.

याशिवाय हायकोर्टाने आंदोलकांना देखील सूचना दिल्या. 'आझाद मैदानाव्यतिरिक्त इतर ठिकाणी आंदोलकांनी वावरु नये. पाच हजारांपेक्षा जास्त लोक आणू नये ही आयोजकांची जबाबदारी होती. पहिल्या दिवशी संध्याकाळी सहानंतर मैदान खाली करणे आवश्यक होते. रस्त्यावर फिरणाऱ्यांना आवाहन करुन मुंबईबाहेर घालवणार का? सामान्य मुंबईकरांना त्रास होईल, असे वागू नका', असे हायकोर्टाने म्हटले.

आझाद मैदानात पाच हजार व्यतिरिक्त आंदोलक नको. गणेशोत्सवात मुंबईत कोंडी व्हायला नको, मुंबईकरांचे आयुष्य पूर्वपदावर यायला हवे. दोन दिवसांमध्ये मुंबईत सर्वकाही पूर्व पदावर आणा असा निर्देश मुंबई हायकोर्टाने आंदोलकांना दिले आहे. पावसाळ्यात मुंबईत आलात, तर चिखलात बसण्याची तयारीही आंदोलकांनी ठेवावी. आझाद मैदान सोडून इतर ठिकाणच्या आंदोलकांना हटवण्यात यावे असे हायकोर्टाने म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shrikhand Puri Recipe: पाडव्याला ताटात हॉटेलसारखी श्रीखंड-पुरी, पाहा झटपट रेसिपी, जिभेवर रेंगाळेल चव

Maharashtra Live News Update : सोलापुरात घरगुती गॅस ऑनलाईन पद्धतीने बुकिंग करताना तांत्रिक अडचणी

Gudi Padwa 2026 : यंदा पाडव्याला करा सगळ्यात हटके लुक, जुन्या आजीच्या साड्यांमध्ये तुम्हीच दिसाल उठून

Kitchen Hacks : बोथट झालेली सुरी फेकू नका, मिनिटांत घरीच वाढवा धार; वाचा सोप्या ट्रिक्स

Shocking : शिक्षकी पेशाला काळिमा! ५ विद्यार्थिनींसोबत अश्लील चाळे, भंडाऱ्यातील संतापजनक प्रकार

SCROLL FOR NEXT