Rain News in Maharashtra Today Saam TV
महाराष्ट्र

Weather Update : रात्री पाऊस, दिवसा ऊन, मुंबईकर हैराण, गुरूवारपासून पावसाची उघडीप, वाचा हवामानाचा अंदाज!

Weather Forecast : मुंबईमध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तर राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Namdeo Kumbhar

Mumbai, Maharashtra, India Weather Forecast : रात्री मुसळधार पाऊस आणि दिवसा कडक ऊन पडत असल्यामुळे उकाडयाने मुंबईकर हैराण झाले आहेत. ऑक्टोबर हिटच्या तडाख्यामुळे मुंबईकरांच्या अंगाची लाही लाही होत आहे. आज मुंबईमध्ये पुन्हा एकदा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर राज्यात गुरुवारपासून पावसाची उघडीप असेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. २६ ते २९ दरम्यान फक्त द. महाराष्ट्रात ४ दिवस किरकोळ पावसाची शक्यता आहे. दरम्यान, दाना चक्रीवादळाचा धोका महाराष्ट्राला नसल्याचेही सांगण्यात आलेय. (Rain News in Maharashtra Today)

गुरुवारपासन महाराष्ट्रात पावसाची उघडीप मिळू शकते, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. २६ ते २९ दरम्यान फक्त द. महाराष्ट्रात ४ दिवस किरकोळ पावसाची शक्यता आहे. चार दिवसात दक्षिण नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर बीड धाराशिव लातूर हिंगोली नांदेड परभणी यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर अश्या १८ जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणी मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता हवमान विभागाने वर्तवली आहे.

दिवाळीत दिलासा -

मुंबईमध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पण दिवळीमध्ये मोठ्या प्रमाणात दिलासा मिळू शकतो. एक नोव्हेंबर नंतर पावसाची पूर्णतः उघडीप मिळू शकते, असे सांगण्यात आलेय.

थायलंडच्या पश्चिम किनारपट्टीसमोर व अंदमान बेटांच्या उत्तरेला, बं. उपसागरात तयार झालेले कमी दाबाच्या क्षेत्राचे आज चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. गुरुवार ओडिसा व पश्चिम बंगाल किनारपट्टीवर आदळण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्राला ह्या चक्रीवादळापासून कोणताही धोका नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: वांद्रे पूर्वमधून वरुण सरदेसाई आघाडीवर

Chopda Vidhan Sabha : निवडणुकीचे काम टाळणाऱ्या २१ कर्मचाऱ्यांवर गुन्हा; विनापरवानगी राहिले गैरहजर

Assembly Election Results 2024 : राज्यात कोणाचं सरकार येणार? सुरुवातीच्या कलात महायुती आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: बहुमताचा आकडा गाठला, सुरुवातीचा कल महायुतीकडे, भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत!

Cleaning Tips: ब्लँकेट रजाईला दुर्गंधी येते का? हे उपाय एकदा करून बघा

SCROLL FOR NEXT