Mumbai Goa highway  Yandex
महाराष्ट्र

पर्यटकांसाठी खुशखबर! ४१ बोगदे अन् २१ पूल, मुंबईहून गोव्याला ६ तासात टच्च; 'हा' महामार्ग ठरणार गेम चेंजर

Mumbai-Goa Highway: मुंबई ते गोव्याला जाण्यासाठी सध्या १२ तास लागतात. मुंबईहून सकाळी निघाल्यानंतर गोव्यात पोहोचायला संध्याकाळ झाली तरी पुढील पाच महिन्यांनी हा प्रवास फक्त सहा तासांचा असेल.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : सध्या मुंबई ते गोव्याला जाण्यासाठी १२ तासांपेक्षा जास्त वेळ लागतो, मात्र लवकरच हा प्रवास अवघ्या सहा तासांवर येणार आहे. कोकण महामार्ग सुरु झाल्यानंतर हा प्रवास अवघ्या निम्म्या तासावर येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. ४६६ किलोमीटर लांबीच्या या महामार्गाचे बांधकाम येत्या ५ महिन्यात पूर्ण होणे अपेक्षित आहे. यानंतर प्रवासाचा वेळ १२ तासांवरून केवळ ६ तासांवर येईल. सरकारने हा प्रकल्प मे-जून २०२५ पर्यंत पूर्ण करण्याची मुदत दिली आहे. यानंतर मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

महामार्गावर तुम्हाला एक नवीन अनुभव मिळेल

हा महामार्ग अनेक गोष्टींनी वैशिष्ट्यपूर्ण असेल, असा दावा बांधकाम संबंधित एजन्सींनी केला आहे. हा महामार्ग अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये बांधण्यात आलेल्या पॅसिफिक हायवेच्या धर्तीवर तयार करण्यात आला आहे. या महामार्गाच्या उभारणीचे काम १४ वर्षांपूर्वी सुरू झाले होते, जे आता पूर्णत्वास आले आहे. प्रकल्पाला लागणारा दीर्घ वेळ आणि वाढत्या खर्चाचा सामना करावा लागला. सुरुवातीला या प्रकल्पाची अंदाजे किंमत ३,५०० कोटी रुपये होती, ती आता ७,३०० कोटी रुपये झाली आहे. महामार्गाला लागणारा दीर्घ वेळ हे त्यामागचे प्रमुख कारण होते. त्यामुळे त्याची किंमत वाढतच गेली. हा महामार्ग नवी मुंबईतील पनवेलपासून सुरू होऊन रत्नागिरीमार्गे जाणार आहे. या महामार्गादरम्यान तब्बल ४१ बोगदे आणि २१ पूल पार करावे लागणार आहेत.

पावसाळ्यापूर्वी आनंदाची बातमी

या महामार्गाचा ८४ किमी लांबीचा पनवेल-इंदापूर विभाग भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) द्वारे विकसित केला जात आहे. तर उर्वरित भागाचे रुंदीकरण सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) करत आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणामुळे पर्यटन, व्यापार आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. यामुळे मुंबई आणि गोवा यांच्यातील कनेक्टिव्हिटी तर सुधारेलच, पण पश्चिम किनारपट्टीवरील व्यावसायिक प्रकल्पांनाही गती मिळेल. महामार्गाचे काम पूर्ण होणे प्रवासी आणि व्यापाऱ्यांसाठी गेम चेंजर ठरणार आहे. पावसाळ्यापूर्वी महामार्गाचे बहुतांश काम पूर्ण होणार असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Home Decor Tips : बेडरुम असो किंवा हॉल घराचे सौंदर्य वाढवण्यासाठी कोणत्या पडद्यांची निवड कराल?

'ऑक्टोबर हिट'मध्ये महाराष्ट्रात पावसाचा धुमाकूळ, कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस, पाहा व्हिडिओ

Child Nutrition: मुलांचं पोट भरणं पुरेसं नाही, योग्य पोषणही महत्त्वाचं; डॉक्टरांनी सांगितलं पालकांनी कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावं?

Maharashtra News Live Update: नाशिकच्या मालेगाव तालुका परिसरात कोसळल्या पावसाच्या सरी

Caste Certificate: कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी किती खर्च येतो?

SCROLL FOR NEXT