multistate bank investors rasta roko andolan at dhule solapur national highway Saam Digital
महाराष्ट्र

मल्टीस्टेट बँकेच्या ठेवीदारांचा धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता राेकाे; जाणून घ्या वाहतुकीची स्थिती

multistate bank investors rasta roko andolan at dhule solapur national highway: ठेवीदारांच्या कोट्यावधी रुपयांच्या ठेवी अडकून पडल्या आहेत. याच ठेवी ठेवीदारांना मिळाव्या यासाठी पाठपुरावा केला जात आहे.

विनोद जिरे

बीड येथे मल्टीस्टेट बँकेचे ठेवीदार आक्रमक होत रस्त्यावर उतरलेत. मल्टीस्टेट बँकांमध्ये अडकलेले पैसे ठेवीदारांना तात्काळ परत केले जावे या मागणीसाठी बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सचिन उबाळे यांच्या माध्यमातून मागील पाच दिवसांपासून उपोषण सुरू आहे. आज सर्व ठेवीदार एकत्र जमत धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर उतरत रास्ता रोको केला आहे.

बीड जिल्ह्यातील ज्ञानराधा मल्टीस्टेट, साईराम मल्टीस्टेट, राजस्थानी मल्टीस्टेट, जिजाऊ मल्टीस्टेट, लक्ष्मी माता अर्बन आणि मराठवाडा अर्बन या बँकेत हजारो ठेवीदारांनी आपल्या ठेवी रोख स्वरूपात ठेवल्या होत्या. परंतु गेल्या सहा महिन्यांपासून या सर्व मल्टीस्टेट बँकांना कुलूप लागले आहे.

त्यामुळे कोट्यावधी रुपयांच्या ठेवी यात अडकून पडल्यात. याच ठेवी ठेवीदारांना मिळाव्या यासाठी पाठपुरावा केला जातोय. परंतु अद्याप ठेवीदारांना त्यांचे पैसे मिळाले नाहीत. अशातच आपल्या ठेवी मिळाव्यात यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र जमत राष्ट्रीय महामार्ग अडवण्यात आला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करून ठेवीदारांनी आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Building collapse: बांधकाम सुरू असतानाच अचानक कोसळला इमारतीचा मोठा स्लॅब; 15 जणांना वाचवलं, जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू

Maharashtra News Live Update: यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत नामांकांचा पाऊस

Rain Alert : राज्यात पुढील काही दिवसांत धो धो पाऊस, 'या' जिल्ह्यांना अलर्ट; तुमच्या जिल्ह्यात कसं असेल हवामान? वाचा

FDAची जुहूतील इस्कॉनच्या अन्न आस्थापनांवर मोठी कारवाई; 3 फूड युनिट्सचे परवाने निलंबित

Ayurveda Benefits : सर्दी-खोकला झटक्यात नाहीसा, डिप्रेशनवरही मात;जाणून घ्या 'या' आयुर्वेदिक वनस्पतींचे फायदे

SCROLL FOR NEXT