Maharashtra State Road Transport Corporation has launched a major plan saamtv
महाराष्ट्र

एसटीचं उत्पन्न वाढणार; परिवहन महामंडळानं आखला मास्टर प्लॅन, अवैध वाहतुकीलाही बसणार आळा

MSRTC : एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढवण्यासाठी अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात राज्यव्यापी कारवाईची तयारी सुरू केली आहे. एसटी बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात या अवैध प्रवाशी वाहतूकदारांनी परवानगी नसणार आहे. जर कोणी नियमांचे उल्लंघन करेल त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.

Bharat Jadhav

  • एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढवण्यासाठी राज्यव्यापी मास्टर प्लॅन तयार

  • परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विशेष अंमलबजावणी मोहीमेचे आदेश

  • अवैध वाहतुकीमुळे एसटीच्या महसुलावर परिणाम होतो.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नेहमीच तोट्यात असल्याचं बोललं जातं, मात्र आता एसटी आता तोट्यातून बाहेर पडणार आहे. एसटीला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी परिवहन महामंडळानं एक मास्टर प्लॅन आखला आहे. आता एसटी बस स्थानकात होणाऱ्या खासगी गाड्यांमधून अवैध प्रवासी वाहतुकीला लगाम घालण्याची योजना आखली आहे.

आता या अवैध प्रवासी वाहतुकीलाच चाप बसणार आहे. सर्व एसटी बसस्थानकांच्या दोनशे परिसरात होणाऱ्या अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घातला जाणार आहे. राज्यभरात ही विशेष अंमलबजावणी मोहीम राबवली जाणार आहे. परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिलेत. ही अवैध वाहतूक रोखली गेली तर एसटी महामंडळाच्या उत्पन्नात आपोआप भर पडेल असा विश्वास आहे.

या मोहिमेअंतर्गत ५ जून ते १५ जून २०२६ या काळात सर्व विभागांमध्ये संयुक्त तपासणी व अंमलबजावणी मोहीम राबविण्यात येणार आहे. यााबाबतचे परिपत्रक एसटी महामंडळाच्या सुरक्षा व दक्षता विभागाकडून जारी करण्यात आले आहे. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने अवैध प्रवासी वाहतुकीसंदर्भात दिलेल्या आदेशांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ही मोहीम राबवण्यात येत आहे.

राज्यभरातील सर्व एसटी बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात खासगी वाहने उभी करून प्रवासी घेणे. प्रवासी गाडीतून उतरविणे यावर बंदी घालण्यात येणार आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाणार असल्याची माहिती सरनाईक यांनी दिली आहे. एसटी महामंडळ ही राज्यातील सर्वसामान्यांची जीवनवाहिनी आहे.

एसटीच्या उत्पन्नावर परिणाम करणारी आणि प्रवाशांच्या सुरक्षेला धोका निर्माण करणारी अवैध प्रवासी वाहतूक कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही. बसस्थानकाच्या परिसरात अनधिकृत वाहतुकीमुळे निर्माण होणारी गर्दी, वाहतूक कोंडी आणि सुरक्षेचे प्रश्न लक्षात घेत ही मोहीम छेडली जाणार असल्याचं सरनाईक म्हणालेत. दरम्यान संबंधित विभान प्रमुखांनी पथकं स्थापन करून नियमित तपासण्या कराव्यात अशा सुचना देण्यात आल्या आहेत. नियमभंग करणाऱ्या वाहनांवर तात्काळ कारवाई करावी, असे निर्देश देण्यात आलेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs Ireland 1st T20I: भारताचा आयर्लंडकडून पहिल्यांदाच पराभव, 'या' ५ कारणामुळे सामन्यासह टीम इंडियानं गमवाली टी-२० मालिका

महसुलात 20 हजार कोटींचा घोटाळा? मुद्रांक शुल्कावर अधिकाऱ्यांचा डल्ला

Beijing Plane Crash: सर्वात उंच इमारतीला विमान धडकलं; थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल

लोहगड हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट, सिया-चेतनचं प्रेम, खुनानंतर ब्लेम गेम, केतनला टक्कल, नात्यात दुराव्याचं कारण?

Maharashtra News Live Update: यवतमाळ शहरात मुसळधार पावसाला सुरूवात

SCROLL FOR NEXT