nagpur, shirdi saam tv
महाराष्ट्र

MSRTC : समृद्धी महामार्गावरुन उद्यापासून नागपूर- शिर्डी बस; स्वस्तात प्रवास, जाणून घ्या तिकीट दर

उद्यापासून धावणार महामंडळाची बस.

मंगेश मोहिते

हिंदुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरुन उद्यापासून (गुरुवार) एसटी महामंडळाच्या नागपुर ते शिर्डी बस सेवेस प्रारंभ हाेत आहे. एसटी महामंडळामुळे कमी वेळात आणि कमी दरात सामान्य नागरिकांना आता समृद्धीचा प्रवास आणि साईंचे दर्शन घडणार आहे. (Maharashtra News)

हिंदुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे नुकतेच पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या हस्ते लाेकार्पण झाले. आता समृध्दी महामार्गवरुन एसटी महामंडळाने नागपुर ते शिर्डी बस सेवा सुरू करण्याचा निर्धार केला आहे.

उद्यापासून या महामार्गावरुन नागपूर ते शिर्डी अशी बस सेवा प्रवाशांसाठी केवळ तेराशे रुपयांत असणार आहे. नागपूरच्या गणेशपेठ आगारात दोन स्लीपर बसेस प्राप्त झाल्या आहेत. ही बस रात्री नऊ वाजता सुटेल आणि पहाटे पाच वाजता शिर्डीत (shirdi) पाेहचले. तसेच रात्री नऊहून शिर्डी येथून सुटेल आणि दुस-या दिवशी नागपूरात (nagpur) पाेहचले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: तुषार गांधींची ८ तासांनंतर मुंबई पोलिसांच्या ताब्यातून सुटका

दुष्काळ जाहीर, मदत अद्याप नाही; १५ दिवसांत शेतकऱ्याची पाचवी आत्महत्या

Amitabh Bachchan: ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना हायकोर्टात हजर राहण्याचे आदेश, ४ वर्षांपूर्वीचं प्रकरण काय?

दिल्ली CJP आंदोलनात सोनम वांगचुकांची एन्ट्री; मोदी सरकारला दिला मोठा इशारा

Maharashtrian Cuisine : महाराष्ट्राची चव, अस्सल खमंग आणि झणझणीत खाद्यसंस्कृतीचा वारसा; नक्की ट्राय करा हे पदार्थ

SCROLL FOR NEXT