msrtc suddenly cancelled bus service from latur today saam tv
महाराष्ट्र

Maratha Andolan : लातूरमध्ये मराठा समाज आक्रमक, प्रवाशांना बसमधून उतरवले; पाच जिल्ह्यात जाणा-या एसटीच्या सर्व फे-या रद्द

Bandh Disrupts ST Bus Services : शुक्रवारी एसटीच्या फे-या रद्द झाल्याने लातूर विभागाचे 11 लाख 28 हजार 768 रुपये इतके नुकसान झाल्याची माहिती प्राप्त झाली.

Siddharth Latkar

संदीप भाेसले

Latur News :

मराठा आंदाेलक मनोज जरांगे- पाटील (manoj jarange patil) यांच्या उपोषणाचा आज (शनिवार) 8 वा दिवस आहे. जरांगे-पाटील यांच्या आंदाेलनाला लातूर येथील सकल मराठा समाजाने पाठिंबा देत शुक्रवारपासून जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदाेलन केले. दरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव लातूर (Latur Bus Stand) जिल्ह्यातून बाहेरगावी जाणा-या एसटी बसच्या फे-या सलग दुस-या दिवशी रद्द करण्यात आल्या आहेत. (Maharashtra News)

लातूर जिल्ह्यातून अन्य जिल्ह्यात तसेच तालुक्यात धावणाऱ्या बस रद्द झाल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. दुसरकीडे खाजगी वाहनधारकांकडून प्रवाशांची मोठी आर्थिक लूट केली जात असल्याचे चित्र आहे.

लातूर जिल्ह्यातून छत्रपती संभाजीनगर, बीड ,धाराशिव, परभणी, नांदेड या मार्गावरील बसच्या फेऱ्या आजही (शनिवार) पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना खाजगी वाहनाच्या मदतीने प्रवास करावा लागत आहे. शुक्रवारी एसटीच्या फे-या रद्द झाल्याने लातूर विभागाचे 11 लाख 28 हजार 768 रुपये इतके नुकसान झाल्याची माहिती प्राप्त झाली.

दरम्यान मराठा समाजातील तरुणांनी आज सकाळी एसटी महामंडळाची एक बस थांबवून प्रवाशांना बसमधून खाली उतरवत रिकामी बस डेपोत परत पाठवली. लातूर-अंबाजोगाई महामार्गावरच्या पळशी फाटा इथे मराठा समाजातील तरुणांनी बस अडवत घोषणा दिल्या.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT