MSRTC ST Corporation 
महाराष्ट्र

MSRTC: मेडिक्लेम योजना, हॉटेल थांब्यासाठी ST महामंडळाची नवं धोरण; परिवहन मंत्र्यांचे निर्देश

MSRTC ST Corporation: एसटी प्रशासनाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्या त्या क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला अत्यंत महत्त्वाचा असून अशा तज्ञांना एसटी महामंडळाच्या अधिकारी व प्रशासनाला मार्गदर्शन करण्यासाठी नेमले जावे अशा सूचना मंत्री प्रताप सरनाईक यांनी या बैठकीत दिल्या.

Bharat Jadhav

एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती समजून घेण्यासाठी तसेच भविष्यातील नियोजना करता आर्थिक श्वेतपत्रिका तयार करण्यात यावी, असे निर्देश परिवहन मंत्री आणि एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिलेत. आज एसटीच्या मुख्यालयात झालेल्या बैठकीमध्ये ते बोलत होते. सुमारे १० हजार कोटी संचित तोटा सहन करणाऱ्या एसटी महामंडळाला कर्मचाऱ्यांचे वेतन, वाहन खरेदी, टायर खरेदी, इंधन खरेदी, स्थानकाचे नूतनीकरण आणि इतर खर्चासाठी दररोज आर्थिक कसरत करावी लागते.

बैठकीला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, वित्तीय सल्लागार आणि मुख्य लेखा अधिकारी गिरीश देशमुख यांचे सह सर्व खात्याचे प्रमुख उपस्थित होते. कर्मचाऱ्यांचे देणी, भविष्य निर्वाह निधीचे हप्ते, कामगार करारातील प्रलंबित देणी यासाठी महामंडळाला पैशाची गरज आहे.

तसेच महामंडळाला इंधन,वस्तु आणि सेवा पुरविणाऱ्या संस्थांची थकीत देणी, यासर्व घटकांचा विचार करून एसटी महामंडळाला सध्या किती उत्पन्न मिळते? किती खर्च येतो? या सर्वांचा लेखा-जोखा मांडणारी एक श्वेतपत्रिका काढणं आवश्यक आहे असते, असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी केले.

दरम्यान 1310 बसेस भाडेतत्त्वावर घेण्याच्या एकूण प्रकरणाची चौकशी तटस्थ व्यक्तीमार्फत केली जाईल, अशा सूचना अतिरिक्त मुख्य सचिव (परिवहन) यांना देण्यात येतील, असंही सरनाईक म्हणाले. लांब पल्ल्याच्या प्रवासामध्ये एसटी बसेस ज्या हॉटेल-मोटेलवर थांबतात, तेथे प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सेवा सुविधाबाबत अनेक तक्रारी निर्माण होत असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं.

यामुळे जे हॉटेल-मोटेल सुविधा पुरवणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई केली जाईल. तसेच परवानगी देत असताना कडक धोरण स्वीकारले जाणार आहे. प्रवाशांच्या तक्रारीनुसार संबंधित हॉटेलवर दंडात्मक कारवाई करण्याबरोबर त्यांचा थांबा रद्द करण्याची देखील तरतूद केली जाईल असं सरनाईक म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT