Sambhajinagar News Saam Tv
महाराष्ट्र

Diwali Special MSRTC Bus : एसटी महामंडळाचा मोठा निर्णय! दिवाळीसाठी अतिरिक्त ५५ गाड्यांचं नियोजन, जाणून घ्या कुठून कुठे धावणार बसेस

Sambhajinagar News : दिवाळी सणानिमित्त बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी मोठा दिलासा! छत्रपती संभाजीनगर एसटी विभागाने आजपासून दररोज ५५ जादा बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे, नागपूर, नाशिक, लातूरसह विविध मार्गांवर या बस धावणार आहेत.

Alisha Khedekar

  • दिवाळी सणानिमित्त दररोज ५५ जादा एसटी बस सोडणार

  • वेगवेगळ्या मार्गांवर प्रवाशांसाठी अतिरिक्त सेवा उपलब्ध करण्यात आली आहे

  • प्रवाशांची दिवाळी सणाच्या तोंडावर गैर सोया होऊ नये म्हणून शासनाचा मोठा निर्णय

  • पुणे, नागपूर, नाशिक, लातूर आदी शहरांकडे प्रवास करणाऱ्यांना दिलासा

प्रवाशांसाठी खुशखबर! दिवाळी सणानिमित्त बाहेर गावी जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. १५ ऑक्टोबर म्हणजे आजपासून छत्रपती संभाजीनगर शहरातून १० वेगवेगळ्या मार्गांवर दररोज ५५ अतिरिक्त एसटी बस सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे गावी जाणाऱ्या नागरिकांची सोय होणार असून तिकीट मिळवण्यासाठी होणारी धावपळही टळणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिवाळीसाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांच्या सुविधेसाठी छत्रपती संभाजीनगर एसटी महामंडळाकडून विविध मार्गावर आजपासून दररोज ५५ जादा बस सोडण्यात येत आहेत. त्यासोबत प्रवाशांच्या गर्दीनुसार ऐनवेळी जादा बस चालविण्याचेही नियोजन एसटी विभागाकडून करण्यात आले आहे.

दिवाळीत प्रवाशांच्या सुविधेसाठी महामंडळाच्या छत्रपती संभाजीनगर विभागाने नियोजन केले. यंदा नागपूर, पुणे, नाशिक, जळगाव, भुसावळ, अकोला, धुळे, शिर्डी, बुलढाणा व लातूर मार्गावर जादा बस सोडण्यात येतील. दरम्यान यामुळे प्रवाशांचा प्रवास सुखरूप होणार आहे.

या मार्गावर धावणार जादा बसे

•सिडको बसस्थानकमधून नागपूर, लातूर, अकोला

•मध्यवर्ती बसस्थानकमधून नागपूर, बुलढाणा, अकोला

•पैठण आगारमधून : पुणे

•सिल्लोड आगारमधून : बुलढाणा, जळगाव, भुसावळ, नाशिक

•वैजापूर आगारमधून; बुलढाणा, नाशिक,

•गंगापूर आगारमधून : पुणे, नाशिक, शिर्डी,

•कन्नड आगारमधून : धुळे, भुसावळ

•सोयगाव आगारमधून : जळगाव, भुसावळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उद्धव ठाकरेंची पाली गावातील शेतकऱ्यांसोबत संवाद

Rahul Gandhi H-Files : राहुल गांधींनी फोडला हायड्रोजन बॉम्ब, ब्राझिलच्या मॉडेलचे नाव घेत भाजपवर पुराव्यासह गंभीर आरोप

शिवसेना शिंदेसेनेला भाजपकडून जोरदार झटका; दोन बड्या नेत्यांची कमळाला साथ, काँग्रेसलाही खिंडार

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी बातमी! नोव्हेंबरचा हप्ता मिळणार नाही? कारण आलं समोर

Hruta Durgule: ‘आली मोठी शहाणी’च्या गोव्यातील चित्रीकरणाचा श्रीगणेशा ! हृता दुर्गुळे - सारंग साठ्ये पहिल्यांदाच एकत्र

SCROLL FOR NEXT