mahavitran employees at kalsubai 
महाराष्ट्र

थकीत वीज बिलाच्या जागृतीसाठी 'महावितरण'चे कर्मचारी कळसुबाईवर

जयेश गावंडे

अकाेला : अकोल्यातील अकोट विभागातील कर्मचाऱ्यांनी विज देयक थकबाकी वसुली संदर्भात संदेश प्रसारीत करण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वात उंच १६४६ मीटरवर असलेले कळसुबाई शिखर नुकतेच सर केले. महावितरणचे थकबाकी देयकाबबत "विज बिल भरा महावितरणला सहकार्य करा" अशा घोषणा देऊन माेहिमेस प्रारंभ झाला. जिद्द व चिकाटीच्या जाेरावर एकमेकांचे मनोधैर्य वाढवून आपल्या जिवाची पर्वा न करता महावितरणच्या कर्मचा-यांनी ही माेहिम सर केली. आमचे आमच्या खात्यावर असलेले प्रेम आणि वाढलेला विज देयक थकबाकीचा डोंगर कशा प्रकारे कमी करता येईल यासाठी आम्ही जागृती करण्याचा निर्णय घेतल्याचे कर्म-यांनी नमूद केले. mseb-mahavitran-employees-kalsubai-electricity-bills-akola-news-sml80

संपुर्ण महाराष्ट्रातील विज ग्राहकांना सामाजिक संदेश देण्याच्या उद्दीष्टाने तसेच चिंतेच्या अवस्थेत असलेले महावितरणचे अधिकारी व कर्मचारी यांचे मनोबल कळसुबाई शिखरा प्रमाणेच उंचविण्यासाठी शिखर सर करुन कर्मचा-यांनी तेथे राष्ट्रीय ध्वज फडकवला.

तेथे mahavitran employees at kalsubai कर्मचा-यांनी राष्ट्रगीत गायिले. थकीत विज बिल भरा महावितरणला सहकार्य करा, विजेची बचत काळाची गरज, सुरक्षा साधनांचा वापर करा जिवितहानी टाळा, विज चोरी टाळा असे फलक हातात घेऊन जागृतीपर संदेश दिला.

या मोहिमेत नेहमीच उत्कृष्ट काम करणारे आणि सामाजिक कार्यात पुढकार घेणारे अकोट उपविभागातील योगेश जयकुष्ण वाकोडे (वरिष्ठ तंत्रज्ञ), अकोट विभागातील कर्मचारी मानव संसाधन विभागातील अरूण देवबाजी दावले, वित्त व लेखा विभागातील किरण मधुकर पवार, सचिन विकास कुलट (वरिष्ठ तंत्रज्ञ), ,मनिष सुभाषराव डाबरे (तंत्रज्ञ) ,गोपाल केदार (कंत्राटी कर्मचारी) तसेच अरविंद विष्णुपंत बानेरकर (कंत्राटदार) सहभागी झाले होते.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: रोहित पवारांना धक्का; कर्जत जामखेडमध्ये राम शिंदे आघाडीवर

Yeola Constituency : येवल्यातून छगन भुजबळ यांना केवळ 86 मतांची आघाडी | Marathi News

Assembly Election Result: सर्वात मोठी बातमी! कॉग्रेसचे ३ दिग्गज नेते पिछाडीवर, महायुतीचा डाव पडला भारी

Maharashtra Election Result: एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांचं काय झालं? पाहा एका क्लिकवर

Maharashtra Assembly Election Result: सुरुवातीच्या कलात काँग्रेसचे 'हे' तीन दिग्गज नेते पिछाडीवर

SCROLL FOR NEXT