mahavitran 
महाराष्ट्र

पैसे नसल्याने दाेन लाख ७६ हजार ९५० ग्राहकांनी थकविले वीज बिल

विजय पाटील

सांगली : एकीकडे कोरोना आणि दुसरीकडे कृष्णा नदीला येणारा महापूर या दुहेरी संकटात सांगलीकर सापडले असल्याने आर्थिक परिस्थिती बिकट बनली असताना आता सांगलीकर जनतेवर वीज बिलाचे संकट काेसळले आहे. वीज बिल भरले नसल्याने महावितरण नागरिकांचे विद्युत कनेक्शन तोडू लागले आहे. पूरेसे पैसे नसल्याने कनेक्शन ताेडू नये असे विनंती करुनही महावितरण mahavitran कारवाई करीत असल्याने सामान्य सांगलीकरांना आता जगायचे कसे असा प्रश्न निर्माण पडला आहे. mseb-mahavitran-appeals-sangli-citizens-to-pay-electricity-bills-marathi-news-sml80

सांगली जिल्ह्यात दाेन लाख ७६ हजार ९५० ग्राहकांचे वीजबिल थकले आहे. या थकबाकीदारांची एकूण रक्कम सुमारे दाेन कोटी २६ लाखांपर्यंत पाेचली आहे. महावितरण सातत्याने ग्राहकांना वीजबिल भरा असे आवाहन करीत आहे. परंतु ग्राहक पैसे भरत नसल्याने महावितरण विद्युत कनेक्शन तोडण्याची कार्यवाही करीत आहे.

गेले दोन वर्षे कोरोना मुळे हाताला काम नाही. होत्या त्या नोकऱ्या काही जणांच्या गेल्या आहेत. जगायचे कसे हा प्रश्न निर्माण झाला असताना दुसरीकडे महापुराचा फटका बसला. अनेकांचे अतोनात नुकसान झाले. यातून जिल्हा सावरत असताना आता वीज महावितरण विभागाने वीज बिल भरण्यासाठी तगादा लावला आहे. आम्ही पैसे काेठून आणायचे असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक करु लागला आहे. सतीश साखळकर, लालू मिस्त्री यांनी विद्युत वितरणने सहकार्य केले पाहिजे अशी मागणी केली.

दरम्यान सांगली जिल्ह्यात नऊ हजार ३१३ ग्राहकांची वीजबिल तोडली आहेत. ज्या ग्राहकांची कनेक्शन तोडले आहे. त्यांनी शेजारच्याकडून वीज कनेक्शन घेतलेले आढळून आले तर त्यांच्यावर फाैजदारी दाखल करु असा इशारा महावितरणने दिला आहे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डायबिटीजमध्ये मीठ की साखर काय खाणे टाळावे?

Maharashtra News Live Update : झेंडूच्या फुलशेतीतून शेतकऱ्याला मिळाला आर्थिक आधार

shiv Sena Symbol Case : शिवसेना पक्ष-चिन्हाच्या सुनावणीचा आज फैसला? पाहा कोर्टात काय घडलं

बीड हादरले! अंगणवाडी सेविकेचा दुर्दैवी मृत्यू, पतीने मुलासमोरच पेट्रोल टाकून पेटवले, मृत्यूपूर्वी महिलेचा धक्कादायक खुलासा

Cricketer Death News: 781 विकेट्स घेण्याऱ्या दिग्गज खेळाडूचं निधन; क्रिकेट विश्वावर शोककळा

SCROLL FOR NEXT