MPSC News
MPSC News saam tv
महाराष्ट्र

MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश! नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू होणार

Rashmi Puranik

MPSC News : पुण्यात सुरु असलेल्या एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश मिळालं आहे. आता एमपीएससीचा नवा अभ्यासक्रम यंदापासून नाही तर 2025 पासून लागू करण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आला आहे. यानंतर विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने याबाबत ट्वीट करून माहिती दिली आहे. 'राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक स्वरूपाच्या परीक्षेसंदर्भातील उमेदवारांची मागणी, कायदा व सुव्यवस्थेची निर्माण झालेली परिस्थिती व उमेदवारांना तयारीसाठी द्यावयाचा अतिरिक्त कालावधी विचारात घेऊन सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन २०२५ पासून लागू करण्यात येत आहे' असे एमपीएससीने ट्वीटमध्ये म्हटले आहे. (Latest Marathi News)

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाविरोधात पुण्याणध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी आंदोलनाला बसले होते. अखेर त्यांच्या या आंदोलनाला यश मिळालं आहे. विद्यार्थी आंदोलकांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी देखील भेट दिली होती.

शरद पवार यांनी आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लोकसेवा आयोग आणि विद्यार्थी प्रतिनिधी यांची बैठक घेण्याचे आव्हान केले होते. ही बैठक आज नियोजित होती. मात्र बैठक न घेताच आयोगाने आज विद्यार्थ्यांच्या बाजुने निर्णय दिला आहे.

आयोगाने विद्यार्थीहिताचा निर्णय घेतला - फडणवीस

राज्य सरकारच्या विनंतीला मान देत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विद्यार्थीहिताचा निर्णय घेतला, याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसेच आम्ही प्रारंभीपासूनच सांगत होतो की, कुठल्याही स्थितीत विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही. त्यांचे हित आमच्यासाठी सर्वोच्च आहे. एमपीएससीने आता नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू होईल, अशा स्वरूपाचा निर्णय अधिकृतपणे जाहीर केला आहे. या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. सर्व विद्यार्थ्यांनाही मनापासून शुभेच्छा!, असे ट्वीट फडणवीस यांनी केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RCB vs CSK IPL 2024 : बेंगळुरूची प्लेऑफमध्ये एन्ट्री पक्की; चेन्नई आयपीएलमधून बाहेर

Indian Politics 2024 : भाजप झाला मोठा संघ झाला छोटा;'आधी RSS ची गरज, आता भाजप सक्षम'

Crime News: युट्यूब पाहून छापल्या लाखोंच्या बनावट नोटा; 9 वी पास तरुणाचा कारनामा

Maharashtra Politics: 'नावं द्या त्या पोलिसांना बघतो मी', उद्धव ठाकरेंनी भरला पोलिसांना दम; मुलुंडच्या राड्यावरून ठाकरेंचा संताप

Kalyan Crime News : यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीवर ज्वलनशील पदार्थ लुटलं, कल्याणमधील घटनेने खळबळ

SCROLL FOR NEXT