मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2026 साठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ दिली आहे. उमेदवारांच्या मागणीचा विचार करून अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 10 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत, तर ऑनलाइन परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत 13 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे.
या परीक्षेद्वारे एकूण 5,707 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून, पूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेल्या शुद्धीपत्रकानुसार विविध मागण्यांचा समावेश करून पदसंख्या वाढविण्यात आली आहे. यापूर्वी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नसून, त्यांनी 'My Account' या पर्यायातून संबंधित माहिती अद्ययावत करावी, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. तसेच, आवश्यक कागदपत्रांची पडताळणी नियुक्तीपूर्वी करण्यात येणार असून, पात्रता सिद्ध न झाल्यास नियुक्तीस अपात्र ठरविण्यात येईल, असेही आयोगाने जाहिरातीत नमूद केले आहे. याबाबतचे शुद्धीपत्रक महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेत स्थळावर उपलब्ध असल्याचे आयोगामार्फत कळविण्यात आले आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मुंबईचे नगरपाल (शेरीफ) कार्यालयातील बेलिफ-लिपिक, गट-क स्पर्धा परीक्षा २०२६ रविवार, ६ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. ही परीक्षा अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई आणि पुणे या जिल्हा केंद्रांवर घेण्यात येणार आहे. परीक्षेचा पेपर एक सकाळी ११ ते दुपारी १२ आणि पेपर दोन दुपारी ३ ते ४ या वेळेत होणार आहेत. अभ्यासक्रम व निवड प्रक्रियेचा तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्याप्रमाणे राहील.
जाहिरातीनुसार अर्ज केलेल्या उमेदवारांना स्थायी किंवा कायमस्वरूपी निवासाच्या तपशीलानुसार जिल्हा केंद्र उपलब्ध करून दिले जाणार असून, परीक्षेच्या सात दिवस आधी प्रवेश प्रमाणपत्र ऑनलाइन अर्ज प्रणालीतील उमेदवारांच्या प्रोफाइलमध्ये उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच, १५ जून २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या मूळ जाहिरातीतील व ३० जून २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या शुद्धीपत्रकातील इतर अटी व शर्तींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नसल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.