CJP Protest MPSC : MPSC विरोधात दिपके मैदानात; विद्यार्थ्याच्या आत्महत्येनं पेपरफुटीचा वाद पेटला, MPSCविरोधात CJP आंदोलन उभारणार META AI
महाराष्ट्र

CJP Protest MPSC : MPSC विरोधात दिपके मैदानात; विद्यार्थ्याच्या आत्महत्येनं पेपरफुटीचा वाद पेटला, MPSC विरोधात CJP आंदोलन उभारणार?

Abhijeet Deepake : MPSC परीक्षेतील कथित पेपरफुटी, परीक्षा विलंब आणि विद्यार्थ्यांच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर CJPचे संस्थापक अभिजीत दिपके आंदोलन उभारण्याच्या तयारीत आहेत.

Saam Tv

दिपकेंनी MPSC पेपरफुटीविरोधात आंदोलनाचा इशारा दिलाय. MPSC पेपरफुटीविरोधात CJPचे संस्थापक अभिजित दिपके मैदानात उतरणार आहेत. दिपकेंनी नेमका काय इशारा दिलाय? सरकारपुढे आता नेमकं आव्हान निर्माण होणार आहे. पेपरफुटीनंतर अनेक विद्यार्थी नैराश्याच्या खोल दरीत आपसूकच ढकलले गेले... अशात पुण्यात MPSCचा अभ्यास करणाऱ्या प्रथमेश देशमुखनं नैराश्यातून आत्महत्या केल्यानं पेपरफुटीचा मुद्दा चांगलाच तापलाय... CJPचे संस्थापक अभिजीत दिपकेंनी आत्महत्या केलेल्या प्रथमेश देशमुखच्या कुटुंबियांची भेट घेतली...आणि त्यानंतर MPSCविरोधात थेट आंदोलन उभारणार असल्याचा इशाराच सरकाराला दिलाय.

याधी MPSC पेपरफुटीविरोधात पुण्यापाठोपाठ कोल्हापूर, नागपूर, संभाजीनगर जळगाव आणि इतर शहरांमध्ये हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते..... त्यावेळीही संतप्त विद्यार्थ्यांनी MPSC अध्यक्ष आणि सचिवांच्या राजीनाम्याची मागणी केली होती... आयोगाचे अधिकारी गोरगरिब विद्यार्थ्यांचं स्वप्नभंग करत असल्याचा आरोप MPSC विद्यार्थ्यानं केलाय..

खरंतर, MPSC ही घटनात्मक संस्था असतानाही राज्यात स्पर्धा परीक्षेत सातत्यानं गैरप्रकार समोर येतायत. MPSC नं घेतलेल्या भरती परीक्षांमधील कोणत्या परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा आरोप आहे.

MPSCच्या या परीक्षांमध्ये घोळाचे आरोप

  1. आरोग्य विभाग भरती - 12 जून 2023

  2. राज्य उत्पादन शुल्क विभाग उपनिरीक्षक भरती - 23 सप्टेंबर 2025

  3. तलाठी भरती - 9 जून 2026

  4. औषध निरीक्षक, गट-ब भरती - 26 ऑगस्ट 2026

  5. एकीकडे MPSC मार्फत घेतल्या जाणाऱ्या

परीक्षेत गैरप्रकाराचे आरोप होत असतानाच दुसरीकडे MPSC आयोगानं महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा पुन्हा एकदा पुढे ढकलली आहे. तिसऱ्यांदा परीक्षा पुढे ढकलल्यानं विद्यार्थीही चांगलेच आक्रमक झालेत. आता थेट CJPनं MPSCविरोधात उडी घेतल्यामुळे आता हा मुद्दा राज्यभरात अधिक पेटण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकार आधीच तोडगा काढणार की यावरून संघर्ष पेटणार? याकडे राज्याचं लक्ष लागलंय.

Maharashtra Lake : आकाशाचं प्रतिबिंब अन् हिरवागार साज, महाराष्ट्रातील 'या' तलावाचं सौंदर्य आहे पाहण्यासारखं

Maharashtra News Live Update: लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरणार

Acidity : सकाळचा चहा विसरा! दिवसाची सुरुवात करा 'या' पेयाने, ॲसिडिटी-जळजळ झटक्यात होईल गायब

गृहमंत्री अमित शाहांच्या रॅलीत भाजप नेत्याचा मृत्यू; राजकीय वर्तुळात शोककळा

Beach Accident : रायगडमध्ये मोठी दुर्घटना! दिवेआगर समुद्रात पुण्यातील ८ पर्यटकांचा बुडून मृत्यू

SCROLL FOR NEXT