Pune MPSC Student Protest:  Saamtv
महाराष्ट्र

MPSC Exam : MPSC परीक्षा लांबणीवर, आंदोलकांची धरपकड, विद्यार्थ्यांचं एकच मिशन, नोटीफिकेशन

MPSC Exam Update : IBPS आणि MPSC ची परीक्षा एकाच दिवशी आल्याने परीक्षेची तारीख बदलण्याची मागणी करत विद्यार्थ्यांनी पुण्यात आंदोलनाचं हत्यार उपसलं. खुद्द शरद पवारांनी आंदोलनात सहभागी होण्याचा इशारा MPSC परिक्षा पुढे ढकलण्यात आली.

Sandeep Gawade

भरत मोहोळकर, साम टीव्ही प्रतिनिधी

MPSC ने 25 ऑगस्टला होणारी परीक्षा पुढे ढकलली. त्यानंतरही विद्यार्थी आंदोलनावर ठाम होते. आयोगाने मागणी मान्य केल्यानंतरही विद्यार्थ्यांचं आंदोलन का सुरु होतं आणि पोलिसांनी आंदोलन कसं मोडीत काढलं? त्यावरचा हा विशेष रिपोर्ट...

IBPS आणि MPSC ची परीक्षा एकाच दिवशी आल्याने परीक्षेची तारीख बदलण्याची मागणी करत विद्यार्थ्यांनी पुण्यात आंदोलनाचं हत्यार उपसलं. अखेर राज्य लोकसेवा आयोगानं परीक्षा पुढे ढकलण्याची घोषणा केली. 25 ऑगस्टची परीक्षा पुढे ढकलली.. तहीरी इतर मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी आपलं आंदोलन सुरूच ठेवलं..मात्र वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर झाल्यामुळे पोलिसांनी अखेर आंदोलकांची धरपकड सुरू केली आणि आंदोलन मोडून काढलं.

विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे राजकीय वातावरणही चांगलंच तापलंय. कारण खुद्द शरद पवारांनी आंदोलनात सहभागी होण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर सूत्रं फिरली आणि एमपीएससीने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एमपीएससीचेही आभार मानले.

MPSC विद्यार्थ्यांच्या मागण्या काय?

परीक्षा किती दिवस पुढे ढकलली त्याचं नोटीफिकेशन काढा

कृषीच्या 258 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करा

कम्बाईन ग्रुप बी आणि सीच्या 15000 हजार जागांची जाहिरात काढा

राज्यसेवेच्या 1500 जागांची जाहीरात प्रसिद्ध करा

कृषी सेवा 2021-22 च्या परीक्षेत निवडलेल्या विद्यार्थ्यांना नियुक्त्या द्या

एमपीएससीनं परीक्षा पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश आलं. मात्र पोलिसांनी आंदोलन मोडून काढल्यामुळे आता इतर मागण्यांबाबत सरकार काय भूमिका घेणार याची उत्सुकता आहे. अन्यथा पुण्यातल्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना आंदोलन नवं नाही. त्यामुळे पुन्हा हे विद्यार्थी रस्त्यावर उतरले तर नवल वाटायला नको.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT