सागर आव्हाड
राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. निवडणुकीच्या कामांमध्ये सर्व सरकारी अधिकारी आणि कर्मचारी व्यस्त आहेत. त्यामुळे MPSC मार्फत घेण्यात येणाऱ्या काही स्पर्धा परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यात. एमपीएससी समन्वय समितीने याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहिले आहे. आचारसंहितेमधून निवडणूक आयोगाची रीतसर परवानगी घेत प्रलंबित परीक्षा आणि निकाल लवकर घ्यावेत अशी मागणी करण्यात आली आहे.
या परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत
1. महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ही परीक्षा २८ एप्रिलला होणार होती. ती अचानक पुढे ढकलण्यात आलीये. आता तीन आठवडे झाले पण नवीन तारीख अजून जाहीर झालेली नाही. तसेच या परीक्षेमध्ये वर्ग एकचे एकही पद नाही. जुन्या अभ्यक्रमानुसार ही शेवटीची संधी असल्यामुळे यात एक हजार वर्ग एकची पदे भरली जावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.
2.समाज कल्याण अधिकारी, गट-ब आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब ही परीक्षा १९ मे ला नियोजित होती. परंतु ही परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आली आहे. पुढील तारीख तीन आठवडे झाले तरी जाहीर करण्यात आली नाहीये. या संवर्गाकरीताची सामाईक चाळणी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
ही परीक्षा अजून जाहीर झाली नाही
संयुक्त पूर्व परीक्षा १६ जुनला नियोजित होती. परंतु त्याच दिवशी युपीएससीची परीक्षा होणार आहे. संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ ची जाहिरात येणार कधी? आणि परीक्षा होणार कधी? असा प्रश्न विध्यार्थ्यांना पडला आहे. जाहिरात निघायला उशीर झाला तर पावसाळ्यात परीक्षा होत नाहीत. तसेच पुढे सप्टेंबर. ऑक्टोबरला विधानसभेची आचारसंहिता लागू शकते. त्यामुळे परीक्षेला अडचण येऊ शकते.
या परीक्षाचा अजून निकाल लागला नाही
संयुक्त पूर्व परीक्षा गट. क ब अजून जाहिरातच निघाली नाही. महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत घेण्यात आलेल्या संयुक्त मुख्य परीक्षा गट .क चा कर सहाय्यक व लिपिक टंकलेखक 2023 मुख्य परीक्षा १७ डिसेंबरला होऊन जवळजवळ 100 दिवस पूर्ण झाले. तरी आयोगाकडून निकालाविषयी कोणतेही प्रसिद्धीपत्रक किंवा निकाल कधीपर्यंत लागेल या बद्दल आयोग काहीही सांगायला तयार नाही. आयोगाला विनंती आहे की परीक्षेचा निकाल व कौशल्य चाचणी तारखे संदर्भात स्पष्टता मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
MPSC आणि स्पर्धा परीक्षेतील विविध प्रश्नांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. विविध निवेदने देण्यात आली आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल नागपुरातून मुंबईत परतले नसल्याने भेट होऊ शकली नाही. परंतु त्यांच्या कार्यालयात आणि त्यांचे सचिव यांना स्पर्धा परीक्षेतील प्रश्नांची वस्तुस्थिती सांगून निवेदने देण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.