Raj Thackeray And Balasaheb Thackeray Saam Tv
महाराष्ट्र

'बाळासाहेबांसारखा अभिनय करून बाळासाहेब होता येत नाही'

शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी मनसे प्रमुख राज ठाकरेंवर केली घणाघाती टीका आहे.

अजय दुधाणे

अजय दुधाणे

बदलापूर : शिवसेना (Shivsena) आणि मनसेमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झालं आहे. 'बाळासाहेबांसारखा अभिनय करून बाळासाहेब होता येत नाही. ज्या माँ साहेबांच्या हातून तोंडात अन्न गेलं पण दुर्दैवं आमचं त्या अन्नासोबत संस्कार नाही गेले, अशी घणाघाती टीका शिवसेनेचे खासदार विनायक राऊत ( Vinayak Raut ) यांनी मनसे प्रमुख राज ठाकरेंवर (Raj Thackeray) केली आहे. ( MP Vinayak Raut Latest News In Marathi )

हे देखील पाहा -

शिवसेनेतर्फे बदलापूरच्या रमेशवाडीमध्ये शिवसंपर्क अभियानाअंतर्गत सभेचे आयोजन केलं होतं. त्या सभेला खासदार विनायक राऊत आले होते. या सभेत त्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. 'बाळासाहेबांसारखा अभिनय करून बाळासाहेब होता येत नाही. ज्या माँ साहेबांच्या हातून तोंडात अन्न गेलं पण दुर्दैवं आमचं त्या अन्नासोबत संस्कार नाही गेले, अशा शब्दात त्यांनी राज ठाकरेंवर तोफ डागली. त्यामुळं मनसेकडून विनायक राऊत यांना काय प्रत्युत्तर मिळणार हे पाहावे लागणार आहे.

दरम्यान, विनायक राऊत यांनी यावेळी संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभेतील निवडणुकीतील माघारीवर भाष्य केलं. 'संभाजी महाराज यांचा आम्हाला आदर आहे. मात्र,संभाजीराजे आपण देवेंद्र फडणवीस यांच्या तालावर नाचत असाल, तर आम्ही सुद्धा ९६ कुळी मराठा आहोत. आम्हाला सुद्धा जातीचा अभिमान आहे. मात्र, जातीपेक्षा आम्हाला भगव्याचा अभिमान आहे. ज्याने ज्याने शिवबंधन बांधले त्याचा सन्मान करणे हे आम्हाला शिवसेनेनं शिकवलं आहे . संभाजीराजे तुम्हाला खासदार व्हायचे होते तेव्हा तुम्ही घड्याळ हातात बांधले. भाजपाचा तंबू चालला. मात्र शिवसेनेचे शिवबंधन चालले नाही हे दुर्दैव छत्रपती घराण्याचं की आम्हा मराठ्यांचे ?, असा सवाल करत राऊतांनी संभाजीराजेंवर जोरदार टीका केली.

Edited By - Vishal Gangurde

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Classy Co-ord Set: ऑफिस किंवा कॉलेजसाठी ट्राय करा 'हे' क्लॉसी को-ऑर्ड सेट्स

Maharashtra Live News Update : पालघर जिल्ह्याला सोमवारी रेड अलर्ट, प्रशासनाकडून सुट्टी जाहीर

Akash Deep : वडिलांचं छत्र हरपलं, ६ महिन्यांत भावाचाही आधार गेला! कसोटीत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आकाश दीपचा संघर्षमय प्रवास

'पप्पा मला अ‍ॅडमिशन घेऊन द्या ना'; पैशांअभावी वडिलांचा थांबण्याचा सल्ला; घरी कुणी नसताना लेकीनं आयुष्य संपवलं

Nashik News: नाशिकमध्ये धो धो! गोदामातेची पुरातच आरती, भक्तांची मांदियाळी|VIDEO

SCROLL FOR NEXT