"औरंगजेब आता है, तो शिवाजी भी उठ खड़े होते हैं" महाराजांचा सोईस्कर वापर करू नका : सुळे  SaamTvnews
महाराष्ट्र

"औरंगजेब आता है, तो शिवाजी भी उठ खड़े होते हैं" महाराजांचा सोईस्कर वापर करू नका : सुळे

विरोधक असला आणि कितीही कठीण परिस्थिती असली तरी त्याच्या कुटुंबाला, महिलांना शिवाजी महाराजांनी कधीही लक्ष्य केले नव्हते, असा प्रहार खासदार सुळे यांनी संसदेत केला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

-- संतोष शाळीग्राम

नवी दिल्ली : "औरंगजेब आता है, तो शिवाजी भी उठ खड़े होते हैं" असे विधान करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (Narendra Modi) संदर्भ देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे यांनी आज लोकसभेत‌ सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. महाराष्ट्रात विरोधी पक्षांच्या नेत्यांना ईडी, सीबीआयच्या नोटीसा पाठविणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा सोईस्कर वापर करू नये, असे सुप्रिया यांनी सुनावले. विरोधक असला आणि कितीही कठीण परिस्थिती असली तरी त्याच्या कुटुंबाला, महिलांना शिवाजी महाराजांनी कधीही लक्ष्य केले नव्हते, असा प्रहार खासदार सुळे यांनी संसदेत केला.

हे देखील पहा :

पंतप्रधानांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा (Shivaji Maharaj) उल्लेख काशी विश्वनाथ धाम काॅरिडाॅरच्या उद्घाटनावेळी केला होता. त्याचा संदर्भ देत सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी लोकसभेतील पुरवणी मागण्यावरील चर्चेदरम्यान सत्ताधाऱ्यांना भाजपवर टिकास्त्र सोडले. शिवाजी महाराज अन्यायाविरुद्ध उभे राहिले, असे पंतप्रधानांनी म्हटले होते. महाराष्ट्रात अनेक जणांची ईडी, प्राप्तिकराची प्रकरणे असतील. त्यातील चूक किंवा बरोबर याबाबत बोलायचे नाही. पण त्यांच्या कुटुंबियांना ज्या प्रमाणे लक्ष्य केले जात आहे, ही दुर्दैवी बाब आहे.

छत्रपतींबद्दल सत्ताधाऱ्यांचे बोलणे भावनिक परंतु वर्तन वेगळे आहे. छत्रपतींनी नेहमी महिला, मुलांचे संरक्षण केले. ईडी, सीबीआयच्या छाप्यांमध्ये महिलांना लक्ष्य केले जात असल्याचे सांगताना सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या पत्नी श्रीमती खडसे, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे कुटुंबिय यांना होणाऱ्या त्रासाचा उल्लेख केला.

राज्य सरकारांना जीएसटीच्या भरपाईसाठी होणारा विलंबाचा मुद्दाही उपस्थित केला. युपीएच्या सत्ताकाळात भाजपकडून कर दहशतवादाचे सरकार (टॅक्स टेररिजम गव्हर्न्मेंट) अशी टिका होत होती. परंतु ज्या प्रकारे जीएसटीची मागणी होते आहे छापे टाकले जात आहेत, यामागचे सत्य काय आहे? लोकांना तुरुंगात टाकले जाणार आहे काय, जीएसटीची वसुली खरोखर होते आहे, की कागदावरच आहे, अशी सवालांची फैरीही सुप्रिया सुळे यांनी झाडल्या.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update:भिवंडी इमारत दुर्घटना; मुख्यमंत्री फडणवीसांची घटनास्थळी पाहणी, महापालिका आयुक्तांना तातडीच्या कारवाईचे आदेश

Bhiwandi : भिवंडीत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे ४ मजली इमारत कोसळली, ९ जणांचा मृत्यू; मृतांची नावे आली समोर

PM Modi: पंतप्रधान मोदींविरोधात आक्षेपार्ह विधान, २५ वर्षांच्या तरुणीविरोधात गुन्हा; नेमकं प्रकरण काय?

श्रावण महिन्यात दही आणि कढी का खात नाहीत? काय आहे त्यामागील धार्मिक आणि वैज्ञानिक कारण?

Girl Child Scheme : राज्य सरकारचा मुलींसाठी खास उपक्रम, गरजू कुटुंबातील मुलींना मिळणार आर्थिक आधार

SCROLL FOR NEXT