Lakhimpur : लखीमपूरमध्ये मंत्री पुत्राने कट रचून शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडले!

लखीमपूरमध्ये घडलेली घटना पूर्वनियोजित असल्याचे एसआयटीने म्हटले आहे. त्यामुळे केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्रा यांचा पुत्र आशिष मिश्रा याच्यासह त्याच्या साथीदारांच्या अडचणी वाढणार आहेत.
Lakhimpur : लखीमपूरमध्ये मंत्री पुत्राने कट रचून शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडले!
Lakhimpur : लखीमपूरमध्ये मंत्री पुत्राने कट रचून शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडले!SaamTvNews
Published On

लखीमपूर खीरी : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपूर खीरी (Lakhimpur Kheri) येथे घडलेला हिंसाचार हा पूर्वनियोजित कटाचा भाग असल्याचे विशेष तपास पथकाने (SIT) म्हटले आहे. लखीमपूरमध्ये तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी काढलेल्या मोर्चात केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याच्या गाडीखाली चिरडून पाच शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर देशात संतापाची लाट उसळली होती. याच प्रकरणाचा अधिक तपास करताना नेमलेल्या एसआयटी च्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या घटनेमुळे भारतीय जनता पक्ष (BJP) अडचणीत आला आहे. या प्रकरणामुळे विरोधकांनी तसेच भाजपमधील अनेक नेत्यांनी अजय मिश्रा यांना मंत्रिपदावरुन हटवण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे (Narendra Modi) केली होती. मात्र, या मंत्र्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत (Election) या प्रकरणाचा मोठा फटका भाजपला बसण्याची शक्यता आहे.

हे देखील पहा :

लखीमपूर प्रकरणात केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा (Ajay Mishra) यांचा मुलगा आशिष मिश्रा (Ashish Mishra) मुख्य आरोपी आहे. तपास करणाऱ्या पोलिसांनी न्यायाधीशांना लिहिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, आशिष मिश्रा वरील आरोपांचे संशोधन होणे गरजेचे आहे. या हिंसाचारात आरोपी असलेल्या आशिष मिश्रा व त्याच्या अन्य साथीदारांवर इतरही खून व कटात सहभागी असल्याचे आरोप आहेत.

राज्याबाहेरील उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत या प्रकरणाच्या तपासावर देखरेख ठेवण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयाने केली होती. यानुसार पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश राकेश कुमार जैन यांची निवड करण्यात आली होती. ते या प्रकरणाच्या तपासावर दैनंदिन देखरेख ठेवून तपास पारदर्शक, निष्पक्ष आणि योग्य होईल, याची काळजी घेत आहेत. याचबरोबर या तपासासाठी नेमलेल्या विशेष तपास पथकात तीन वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांचा समावेश सर्वोच्च न्यायालयाने केला होता. यात एस.बी.शिरोडकर, दिपेंदरसिंह आणि पद्मजा चौहान या तिघांचा समावेश आहे.

आता एसआयटीने हा हिंसाचार पूर्वनियोजित कट असल्याचा निष्कर्ष काढला आहे. केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा (Ashish Mishra) याच्यावर आता खुनाचे गुन्हे दाखल आहेत. आता हा कट असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्याविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हेही दाखल करण्यात येतील. याबाबत एसआयटीने या प्रकरणाच्या तपासावर देखरेख ठेवणाऱ्या न्यायाधीशांना माहिती दिली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Lakhimpur : लखीमपूरमध्ये मंत्री पुत्राने कट रचून शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडले!
ब्रेकऐवजी ऍक्सीलेटर दाबला; चारचाकी विहिरीत पडून महिलेचा मृत्यू!
Lakhimpur : लखीमपूरमध्ये मंत्री पुत्राने कट रचून शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडले!
माझ्या जीवनात सगळ्यात उत्तम जेवण आज जेवले - पंकजा मुंडे

लखीमपूर खीरी येथे 3 ऑक्टोबरला शेतकऱ्यांना चिरडण्यात आले होते. या घटनेत चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्राने हे कृत्य केले होते. या प्रकरणी आशिषला अटक करण्यात आल्यानंतर त्याला जिल्हा कारागृहात ठेवण्यात आले आहे. या प्रकरणी आतापर्यंत १३ जणांना अटक झाली आहे. यात आशिष मिश्रासह सुमित जयस्वाल, अंकित दास, लतिफ ऊर्फ काले, शेखर भारती, शिशू पाल, सत्य प्रकाश त्रिपाठी, नंदनसिंह बिश्त, आशिष पांडे, मोहित त्रिवेदी, रांकू राणा, धर्मेंद्र आणि लवकुश राणा यांचा समावेश आहे.

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात गेली वर्षभरापासून शेतकरी आंदोलन करीत आहेत. लखीमपूर खीरी येथे केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा आणि उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य हे 3 ऑक्टोबरला गेले होते. त्यावेळी केंद्रीय गृहराज्य मंत्री मिश्रा यांचा मुलगा आशिष आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये बाचाबाची झाली होती. याचवेळी ही घटना घडली होती. यात 8 जणांचा मृत्यू झाला होता आणि त्यातील 4 शेतकरी होते.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com