ranjitsinh naik nimbalkar saam tv
महाराष्ट्र

रामराजेंची अवस्था ‘साठी बुद्धी नाठी’ : खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर

भाजपाच्या मेळाव्यास जिल्ह्यातील व माण तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित हाेते.

Siddharth Latkar

बोराटवाडी (जि. सातारा) : फलटणकरांचा (phaltan) कार्यकाल आता संपत आला आहे. साठी बुध्दी नाठी अशी त्यांची अवस्था झाली आहे. त्यामुळेच ते द्वेषाचे राजकारण करीत आहेत. त्यांनी शिष्टाचार पाळावा असे आवाहन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (ranjitsinh naik nimbalkar) यांनी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर (ramraje naik nimbalkar) यांना (satara) केले आहे. (ranjitsinh naik nimbalkar latest marathi news)

भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा बोराटवाडी येथे मेळावा झाला. त्यावेळी खासदार रणजितसिंह बाेलत हाेते. व्यासपीठावर भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे (jaykumar gore) यांच्यासह जिल्ह्यातील व माण तालुक्यातील भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित हाेते.

रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले आमदार जयकुमार गोरे यांच्याबाबत नेहमीच षडयंत्र रचले जाते. गाेरेंवर सातत्याने खाेटे आराेप करुन त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जाताहेत. काही दिवसांपुर्वी असेच षडयंत्र आमदार गाेरेंवर रचले गेले. ईलेक्शन आले की एनसपीपी (ncp) आणि फलटणकरांचा उद्याेग सुरु हाेताे. आता तुमचा कार्यकाल संपत आला आहे. त्यामुळे इतरांनी (विराेधकांनी) राजकारणातील शिष्टाचार पाळावा असेही खासदार निंबाळकरांनी नमूद केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

Traffic Rules: चप्पल घालून कार चालवल्याने चलान लागतं? काय आहे नियम?

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT