आमच्यासोबत कोण? शुक्रवारी स्पष्ट होईल, सतेज पाटलांच्या राजकीय गुगलीने उडाली खळबळ

राज्यसभा निवडणुकीवरुन आज काँग्रेसच्या सतेज पाटील यांनी सूचक वक्तव्य केले आहे.
Satej Patil, Devendra Fadnavis
Satej Patil, Devendra FadnavisSaam Tv

कोल्हापूर: राज्यसभा निवडणुकीवरून (Election) राज्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी आता निवडणूक होणार आहे. ही बिनविरोध होणार अशा चर्चा सुरू होत्या. पण या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) विरुद्ध भाजप अशी लढत होणार आहे. यावरुन आता दोन्हीकडून दावे-प्रतिदावे सुरू आहेत. काल काँग्रेस नेते सतेज पाटील (Satej Patil) यांनी भाजपचे आमदार सांभाळा असा दावा केला होता. यावर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर देत, आमच एकही मत फुटणार नाही, दिवसा स्वप्न पाहू नका, असा टोला लगावला होता. यावर आता सतेज पाटील यांनी सूचक वक्तव्य केले आहे.

Satej Patil, Devendra Fadnavis
Latur : आमचं एकही मत फुटणार नाही, दिवसा स्वप्न पाहू नका; फडणवीसांचा टोला

काल देवेंद्र फडणवीस यांनी टीका करत महाविकास आघाडीने (Mahavikas Aaghadi) दिवसा स्वप्न पाहणे बंद करावे असा टोला लगावला होता. भाजपचा एकही आमदार फुटणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावर आज सतेज पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. येणाऱ्या १० तारखेला समजेल महाविकास आघाडीसोबत कोण आहे, असे सूचक विधान त्यांनी केले.

सतेज पाटलांच्या गुगलीने उडाली खळबळ

या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. कोल्हापूरच्या राजकारणात सतेज पाटील विरुद्ध भाजपचे धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) असे चित्र आहे. पाटील यांचे महाडिक हे राजकीय स्पर्धक मानले जातात. त्यामुळे पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. मुंबईत ७ जूनला महाविकास आघाडीच्या आमदारांची बैठक होणार आहे. या बैठकीला अपक्ष आमदारही असणार आहेत, असंही पाटील म्हणाले.

Satej Patil, Devendra Fadnavis
राज्यसभा निवडणूक: भाजपचे आमदार फुटणार?, काँग्रेस नेत्याच्या वक्तव्यामुळं चर्चेला उधाण

अपक्ष आमदारांना महाविकास आघाडीचे विचार मान्य आहेत. त्यामुळे अपक्ष आमदारही आमच्यासोबत आहेत. विरोधी पक्ष आम्हाला आमदार सांभाळा म्हणत असतील तर त्यांनी अगोदर त्यांचे आमदार सांभाळावेत. आमच्या सोबत कोण आहे हे १० जूनला स्पष्ट होईल, असं सूचक वक्तव्य सतेज पाटील (Satej Patil) यांनी केले.

दिवसा स्वप्न पाहू नका; फडणवीसांचा टोला

राज्यसभा निवडणुकीवरुन आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. सतेज पाटील यांनी भाजपवर टीका केल्यानंतर फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले. फडणवीस म्हणाले की, सर्वच पक्षात सर्वच नेते आहेत त्यांनी दिवसा स्वप्न बघू नये. राज्यसभा निवडणुकीत भाजपचे एकही मत फुटणार नाही. ते त्याच्या पक्षात तंग झाले म्हणून ते इकडे आलेले आहेत असा टोला त्यांनी लगावला आहे. तसेच भाजपाकडे एजन्सी आहे तर आमच्याकडे राज्य सरकार असा दम आज शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला होता. राऊतांच्या या वक्तव्यावर कोण संजय राऊत? असा प्रति सवाल उपस्थित करत ते काय फार तत्ववेत्ते आहेत का? ते दिवस भर उलटसुलट बोलत असतात, त्याच्या प्रश्नावर मी का उत्तर देऊ? असं म्हणत त्यांनी राऊतांनाही टोला लगावला आहे.

Edited By- Santosh Kanmuse

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com