MP Omraje Nimbalkar 
महाराष्ट्र

मैदानात उतरणारा खासदार! छातीभर पाण्यात ओमराजे उतरले अन् आजी-नातवाला वाचवले, पाहा व्हिडिओ

MP Omraje Nimbalkar rescues family during Dharashiv floods : धाराशिवमध्ये आलेल्या पुरामध्ये खासदार ओमराजे निंबाळकर स्वतः छातीइतक्या पाण्यात उतरले. एनडीआरएफसोबत बचावकार्य करत त्यांनी आजी आणि लहान मुलाला वाचवलं. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.

Namdeo Kumbhar

MP Omraje Nimbalkar : धाराशिवमध्ये आभाळ फाटल्यासारखा पाऊस पडलाय. त्यामुळे अनेक ठिकाणी पुराची स्थिती निर्माण झाली आहे. पूरस्थितीमुळे गावांचा संपर्क तुटलाय, जनावरे वाहून गेलीत. मागील दोन दिवसांत धाराशिवमध्ये पावसाने रौद्ररूप धारण कलेय. लोकांची दैयनीय अवस्था झाली आहे. याच धाराशिवकरांच्या मदतीला खासदार ओमराजे निंबाळकरही जिवाची बाजी लावत आहेत. रात्रीच्या अंधारात ओमराजे निंबाळकर छातीइतक्या पाण्यात उतरले अन् कुटुंबाला वाचवले.

ओमराजे निंबाळकर यांचा या मदतीचा व्हिडिओ सध्या समोर आलाय. सोशल मीडियावर ओमराजे यांचे तोंडभरून कौतुक केले जातेय. असा खासदार पुन्हा होणार नाही.. दादांना मतदान केल्याचे समाधान मिळाले, यासारख्या कमेंट्स केल्या जात आहेत. रात्रीच्या वेळी अक्षरशः गळ्यापर्यंत पाण्यात उतरून गेले २ दिवस ओमराजे निंबाळकर जनतेच्या मदतीला उतरले आहेत. अशी मदत करणारा हा पहिलाच लोकप्रतिनिधी असेल, धाराशिव जिल्ह्याचं खरंच नशीब आहे, यासारख्या कमेंट्स् सोशल मीडियावर येत आहेत. पाहा व्हिडिओ....

जनता संकटात असल्याचे पाहिलं अन् ओमराजे निंबाळकरही मैदानात उतरले. छाती इतक्या पाण्यात उतरून त्यांना मदत केली. वरून धो धो पाऊस अन् खाली चिखलात रूतणारे पाय.. पण मतदान करणारा संकटात असताना ओमराजेही मैदानात उतरले. पुरात अडकेल्या एका कुटुंबाला ओमराजे यांनी वाचवले. एनडीआरएफसोबत ओमराजेही मदतीसाठी छातीइतक्या पाण्यात उतरले. धाराशीवचे खासदार ओमराजे निंबाळकर स्वतः पुराच्या पाण्यात उतरले. पुराच्या पाण्यात अडकलेल्या आजी आणि नाताला वाचवण्यासाठी खासदाराने जिवाची बाजी लावली. अन्न पाण्याविना मदतीच्या प्रतीक्षात असलेल्या लोकांना वाचवण्यासाठी खासदार पुराच्या पाण्यात उतरले. त्यांनी एनडीआरएफ टीमच्या मदतीने आजी अन् नातीचा जीव वाचवला.

खासदार ओमराजे निंबाळकर यांची फेसबुक पोस्ट

आज वडनेर ता.परंडा येथे अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात एकाच कुटुंबातील एक आजी व २ वर्षाचा मुलगा व २ व्यक्ती रात्री २ पासून पूर्ण पाण्याने वेढले होते व स्वतःच्या घरावर अन्न व पाण्यविणा मदतीच्या अपेक्षेने अडकले होते. NDRFच्या जवांनाच्या मदतीने मी स्वतः या कार्यात सहभागी होऊन कुटुंबाला सुखरुप बाहेर काढण्यासाठी आज यश आल्याने मनाला खूप समाधान मिळाले. या कार्यात NDRF च्या जवानांनी व गावकऱ्यांनी देखील कष्ट व मेहनत घेऊन सदरील बचावकार्य यशस्वी रित्या पार पाडले. याबद्दल सर्वांचे मनापासून आभार व अभिनंदन.!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीस उद्या पुरग्रस्त भागाची पाहणी करणार

Katrina Kaif Pregnancy: कतरिना-विकीच्या घरी येणार नवा पाहुणा; क्यूट स्टाईलमध्ये दिली गुड न्यूज

Dharashiv : पुरात कुटुंब अडकलं, ठाकरे सेनेचे खासदार ओमराजे मदतीसाठी पाण्यात | पाहा VIDEO

Name Astrology: नाव सांगतं तुमचा स्वभाव! V, M, B, H नावांमध्ये लपलेले रहस्य उघड

Viral Video: शाळा आहे की डान्स बार? रात्रभर महिलांना नाचवलं, लहान मुलांसमोर अश्लिल हावभाव; VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT