navneet rana  saam tv
महाराष्ट्र

Video : खासदार नवनीत राणांनी क्रिकेटचं मैदान गाजवलं; गोलंदाजांची केली बेदम धुलाई

राणा यांनी क्रिकेटच्या मैदानात तुफान बॅटिंग करत क्रिकेटचा मनमुराद आनंद लुटला

साम टिव्ही ब्युरो

अमर घटारे

Navneet Rana News : खासदार नवनीत राणा या राजकारणात आक्रमक स्वभावामुळे ओळखल्या जातात. राजकारणात नवनीत राणा यांचे विरोधक देखील त्यांना दचकून असतात. राणा या त्यांच्या मतदारसंघातील लोकांमध्ये नेहमी मिसळून राहताना दिसतात. गरबा असो किंवा गणेशोत्सव हे सण वेळी त्या आवर्जुन लोकांमध्ये मिसळून साजरा करताना दिसतात. गरबा खेळताना त्यांच्या नृत्यांची झलक पाहायला मिळते. त्यानंतर आता क्रिकेटच्या मैदानात तुफान बॅटिंग करत क्रिकेटचा मनमुराद आनंद लुटला आहे. (Latest Marathi News)

मैदान राजकारणाचे असो वा खेळाचे यात अग्रेसर राहणाऱ्या अष्टपैलू अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी आज, रविवारी अमरावतीच्या अंबिका नगर येथे क्रिकेटचे मैदान गाजवले. क्रिकेटच्या मैदानात मुलांसोबत क्रिकेट खेळून आपण कुठल्याही क्षेत्रात मागे नसल्याचे दाखवून दिले.

खासदार नवनीत राणा यांच्या धुवांधार बॅटिंगने मात्र यावेळी क्रिकेटप्रेमींचा उत्साह वाढला होता. हातात बॅट घेऊन नवनीत राणा (Navneet Rana) यांनी बॅटिंग करत दोन्ही बाजूने धावत धावाही कुटल्या. नवनीत राणा यांचा बॅटिंग करतानाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

...अन् नवनीत राणा यांनी भोजन कक्षात जाऊन लाटल्या पोळ्या

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथे सुरू असलेल्या श्रीराम कथा व विशाल संत संमेलनात अमरावती जिल्हाच्या खासदार नवनीत राणा यांनी उपस्थिती दर्शवली. नवनीत राणा यांनी या संमेलनात संत-महात्म्यांचे आशीर्वाद घेतले व महाआरती केली.

या पवित्र ठिकाणी रोज 10 हजार लोकांना महाप्रसाद वितरित केला जातो. या संमेलनाच्या भोजन कक्षात जाऊन खासदार नवनीत राणा यांनी स्वतः पोळ्या लाटल्या व आपली सेवा अर्पण केली. पोळ्या लाटताना त्यांच्यासोबत इतरही महिला उपस्थित होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shweta Tiwari: ४४ वर्षाच्या श्वेता तिवारीचा ग्लॅमरस लुक, फोटो पाहून चाहते फिदा

Maharashtra Rain Live News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाण पुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार लोकार्पण

Navi Mumbai : गटाराच्या पाण्यात महिलेने धुतली भाजी, नवी मुंबईतील प्रकार; किळसवाणा Video Viral

Ayushman Bharat Scheme: उपचार करायचाय? पण आयुष्मान कार्ड हरवलंय, तर कसा होणार मोफत उपचार? काय आहे नियम

Heavy Rain : मुसळधार पावसाचा हाहाकार; कल्याण- डोंबिवलीतील सखल भागात पाणी, जनजीवन विस्कळीत PHOTO

SCROLL FOR NEXT