Narayan Rane News  Saam tv
महाराष्ट्र

Narayan Rane :...तर एकही घरी गेला नसता; मालवणमधील राड्यावर नारायण राणेंची आक्रमक प्रतिक्रिया

Narayan Rane on Malvan Rada : मालवणमध्ये आदित्य ठाकरे आणि नारायण राणे कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. मालवणमधील राड्यावर नारायण राणेंची आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे.

Vishal Gangurde

मालवण : सिंधुदुर्गच्या मालवणमधील रोजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. आज बुधवारी या घटनास्थळाची पाहणीसाठी आमदार आदित्य ठाकरे आणि खासदार नारायण राणे एकाचवेळी आले होते. यावेळी दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्यानंतर हाणामारी देखील झाली. यावेळी दोन्ही नेत्यांच्या महिला कार्यकर्त्यांही एकमेकांना भिडल्या. या राड्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कार्यकर्त्यांची हाणामारी रोखण्यासाठी पोलिसांना मध्यस्थी करावी लागली. या किल्ल्यावरील संपूर्ण राड्यावर भाजप नेते, खासदार नारायण राणे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

मालवणमध्ये ठाकरे आणि राणे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीची घटना घडल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी टीका केली आहे. तर आता याच घटनेवर खासदार नारायण राणे यांनी देखील आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे.

खासदार नारायण राणे म्हणाले, ' निवडणुका समोर असल्याने विरोधक त्याचे भांडवल करत आहेत. छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळणे हे निमित्त करून तिन्ही विरोधी गट एकत्र येऊन टीका करत आहेत. मालवण येथील लोक येथे पुतळ्यासमोर नतमस्तक झाली आहेत. मात्र आज जे आले आहेत. त्यातील एकही या राजकोट ठिकाणी येऊन नतमस्तक झाले नव्हते. आरोपापलीकडे यांचं सामाजिक कार्य नाही'.

'आम्हाला शिवद्रोही बोलतात. उद्धव ठाकरेंकडून काय अपेक्षा? हिंदूत्व आणि छत्रपती शिवराय यांच्या नावाचा वापर करून उदरनिर्वाहाचे साधन उद्धव ठाकरे यांनी केले. आज आमच्याकडून काहीही झालं नाही. मी काही चिरीमिरी करत नाही. नाही तर एकही घरी परत गेला नसता, अशी आक्रमक प्रतिक्रिया नारायण राणे यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ओबीसींचं नुकसान झालेलं नाही, राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अध्यक्षांचं विधान; VIDEO

Bihar Election : ऐन निवडणुकीत इंडिया आघाडीला जोरदार झटका, एका राज्यातील सत्ताधारी मित्रपक्ष फुटला

Maharashtra Politics: अजित पवारांच्या गटात बेशिस्तपणा वाढलाय; राष्ट्रवादीचा माजी आमदार भाजपात जाणार

Sunday Horoscope : तुम्ही यशाच्या अगदी जवळ जाणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात येणार टर्निंग पॉईंट

Maharashtra Live News Update : दगडूशेठ गणपती मंदिरावर फुलांची आकर्षक सजावट

SCROLL FOR NEXT