uday Thanekar News Saam tv
महाराष्ट्र

‘तुतारीचा बादशहा’ हरपला; सोशल मीडियावर भावुक रीलमधून आठवणींना उजाळा

uday Thanekar News : 'तोंडातील तुतारीचा बादशहा' म्हणून प्रसिद्ध उसलेले उदय ठाणेकर यांचं निधन झालं. ठाणेकर यांच्या जाण्याने इचलकरंजी शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Saam Tv

उदय ठाणेकर हे ‘तोंडातील तुतारीचा बादशहा’

कोणत्याही वाद्य न वापरता तोंडाने तुतारीचा आवाज काढण्याची कला

रिक्षा चालक असतानाही ३०-४० वर्षे लोककलेत उमटवला ठसा

रणजीत माजगावकर, साम टीव्ही

कोल्हापूरच्या इचलकरंजी शहरातील एक आगळावेगळे कलावंत, तोंडाने तुतारीसारखा घणाघाती आवाज काढून शिवकालीन परंपरा जिवंत ठेवणारे उदय ठाणेकर यांचे एक महिन्यांपूर्वी निधन झालंय. त्यांच्या जाण्याने शहरात हळहळ व्यक्त झाली होती. मात्र सोशल मीडियावर पुन्हा एकदा उदय मामा ठाणेकर यांचे रील फिरत असल्यामुळे त्यांच्या आठवणींना उजाळा मिळत आहे.

६५ वर्षीय उदय ठाणेकर यांनी कोणतेही औपचारिक शिक्षण न घेता स्वतःच्या मेहनतीवर आयुष्य उभं केलं. रिक्षा चालक म्हणून काम करत असतानाच त्यांनी तोंडाने तुतारी वाजवण्याची विलक्षण कला आत्मसात केली. इयत्ता सातवीत असताना घडलेल्या एका प्रसंगातून ही कला त्यांना सापडली आणि पुढे तीच त्यांची ओळख बनली.

छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचे निष्ठावंत भक्त असलेले ठाणेकर जयंती, मिरवणुका, सभा आणि लग्नसमारंभात आपल्या तुतारीच्या आवाजाने रंगत आणायचे. भगवा वेश, तुतारीचे सूर आणि नाचत-गात सादरीकरण हा त्यांचा खास अंदाज होता.

गेल्या ३० ते ४० वर्षांपासून इचलकरंजीत त्यांनी आपल्या कलेचा ठसा उमटवला. साध्या, मनमिळावू स्वभावामुळे ते सर्वांच्या मनात घर करून होते. उदय ठाणेकर यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि विवाहित मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने इचलकरंजीचा ‘तोंडातील तुतारीचा बादशहा’ हरपल्याची भावना व्यक्त झाली होती मात्र सध्या समाज माध्यमांवर त्यांचे अनेक रील फिरत आहेत. त्यामुळे त्यांच्या तुतारीची आठवण पुन्हा एकदा इचलकरंजीकरांना येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आखाती युद्धाचा परिणाम! डॉलरसमोर रुपया कोसळला; 95.22 वर ऐतिहासिक नीचांक|VIDEO

Viral news: समुद्र किनाऱ्यावर घडली मोठी दुर्घटना; अंघोळीला गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू

बिझनेसमन बाप ओरडला, २२ वर्षीय मुलीने रागात मृत्यूला कवटाळलं; त्या दिवशी नेमकं काय घडलं?

Maharashtra Live News Update: भाजप आमदार सुरेश धस यांनी गायले गीत

वेळप्रसंगी पालखीसमोर आडवे पडू; आळंदीत पालखी मुक्कामावरून वाद, नेमकं प्रकरण काय? VIDEO

SCROLL FOR NEXT