दारूसाठी घेतला आईचा जीव ! लक्ष्मण सोळुंके
महाराष्ट्र

दारूसाठी घेतला आईचा जीव !

जालन्यामध्ये दारुड्या मुलाने दारू खरेदी करण्यासाठी घरातील धान्य विकायला घेऊन जात असताना, आईने अडवले म्हणून आईला बांबूने मारहाण करून खून केल्याची घटना घडली आहे.

लक्ष्मण सोळुंके

जालना : जालना जिल्ह्याच्या परतूर तालुक्यातील लोणी गावात दारुड्या मुलाने दारू खरेदी करण्यासाठी घरातील धान्य विकायला घेऊन जात असताना, आईने अडवले म्हणून आईला बांबूने मारहाण करून खून केल्याची घटना घडली आहे.

परतूर तालुक्यातील लोणी गावातील सखाराम शिंदे या तरुणाला दारूचे व्यसन असल्याने तो दारूच्या आहारी गेलेला आहे. दारू पिण्यासाठी तो घरातील वस्तूंची नेहमी विक्री करत असायचा. गुरुवारी सकाळी दारू साठी पैसे नसल्याने तो घरातील गुहू आणि तांदूळ घरून विक्री साठी घेऊन जात असताना आपल्या घरात खाण्यासाठी एव्हढेच गहू आणि तांदूळ असल्याचे म्हणत त्याला आईने अडविण्याचा प्रयत्न केला.

हे देखील पहा -

नशेत बेधुंद असलेल्या सखाराम शिंदे आईने शेजारीच पडलेल्या बांबूच्या काठीने आईला मारहाण करायला सुरुवात केली. या मारहाणीत त्याच्या आईच्या डोक्यात जबर मार लागल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. शेजारीच असलेल्या नागरिकांनी या महिलेला उपचारासाठी आष्टी येथील प्राथमिक रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याची प्रकृती गंभीर आणि चिंताजनक असल्याने त्यांना आष्टी येथील प्राथमिक रुग्णालयातून जालना येथे नेण्यात येत असताना त्यांचा रस्त्यातच दुर्दैवी मृत्यु झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मृत्यु झालेल्या महिलेच्या पतीच्या तक्रारी वरून आरोपी सखाराम शिंदे या मुलाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी अधिक तपास आष्टी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी नागवे हे करत आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: भुसा पाडायला आलोय, दादा भुसेंवर टीकास्त्र; शिंदे सेनेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली !

Sanju Samson Six: खूप जोरात लागला..संजूच्या षटकारामुळे महिला फॅनला रडू कोसळलं - VIDEO

IND vs SA: संजू सॅमसनने खेचला 1500 वा षटकार! टीम इंडियाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

Assembly Election: बटेंगे तो कटेंगेला भाजपातूनच विरोध; पंकजा मुंडेंनंतर अशोक चव्हाणांचाही विरोध

IND vs AUS: बुमराह बॅटिंगला आला अन् रिषभ गोलंदाजीला; BCCI ने शेअर केला दोघांच्या जुगलबंदीचा VIDEO

SCROLL FOR NEXT